मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी लेखिका आहेत. १९६०मध्ये दिल्ली स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मृदुला गर्ग
जन्म नाव मृदुला आनंद प्रकाश गर्ग
जन्म ऑक्टोबर २५, इ.स. १९३८
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा हिंदी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, सदरलेखन, विनोदी लेखन
प्रसिद्ध साहित्यकृती चित्तकोबरा, कठगुलाब
वडील बीरेंद्र प्रसाद जैन
आई रविकांता जैन
पती आनंद प्रकाश गर्ग
अपत्ये आशिष, विक्रम

मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत. कठगुलाब ही कादंबरी मराठी, मल्याळी आणि जपानी भाषेत अनुवादित झाली आहे. मराठी अनुवाद वनिता सावंत यांनी २००७ साली केला आहे; तो साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे..

मृदुला गर्ग या ’इंडिया टुडे’ साप्ताहिकात तीन वर्षे ’कटाक्ष’ नावाचे सदर लिहीत होत्या.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संमेलनात मृदुला गर्ग यांनी हिंदी साहित्यात महिलांबाबत होणारा भेदभाव या विषयावर व्याख्यान दिले होते.

मृदुला गर्ग यांच्या लिखाणात त्यांची पर्यावरण-संवर्धनासंबंधी जागरुकता दिसून येते. महिला आणि मुले यांच्यासाठी समाजकार्य करण्यात त्यांना रस आहे.

मृदुला गर्ग यांची प्रसिद्ध पुस्तके

संपादन
  • अनित्य (कादंबरी -१९८०)
  • उर्फ सैम (कथासंग्रह -१९८६)
  • उसके हिस्से की धूप (कादंबरी -१९७५)
  • एक और अजनबी (नाटक -१९७८)
  • एक यात्रा संस्मरण- कुछ अटके कुछ भटके (ललित लेखसंग्रह)
  • कठगुलाब (कादंबरी -१९९६)
  • कर लेंगे सब हज़म (विनोदी -२००७)
  • कितनी कैदें (कथासंग्रह -१९७५)
  • खेद नहीं है (विनोदी -२००९)
  • ग्लेशियर से (कथासंग्रह -१९८०)
  • चर्चित कहानियॉं (कथासंग्रह -१९९३)
  • चित्तकोबरा (कादंबरी -१९७९)
  • चुकते नहीं सवाल (ललित लेखसंग्रह -१९९९)
  • छत पर दस्तक (कथासंग्रह -२००६)
  • जादू का कालीन (नाटक -१९९३)
  • जूते का जोड़ गोभी का तोड़ (कथासंग्रह -२००६)
  • टुकड़ा टुकड़ा आदमी (कथासंग्रह -१९७६)
  • डैफ़ोडिल जल रहे हैं (कथासंग्रह -१९७८)
  • तीन कैदें (नाटक -१९९६)
  • दस प्रतिनिधी कहानियॉं (कथासंग्रह -२००७)
  • मंज़ूर नामंज़ूर (प्रेमकथा -२००७)
  • मिलजुल मन (कादंबरी -२००९)
  • मृदुला गर्ग की यादगारी कहानियॉं (कथासंग्रह -२०१०)
  • मेरे देश की मिट्टी अहा (कथासंग्रह २००१)
  • मैं और मैं (कादंबरी -१९८४)
  • रंग ढंग (ललित लेखसंग्रह -१९९५)
  • वंशज (कादंबरी -१९७६)
  • शहर के नाम (कथासंग्रह -१९९०)
  • संगति विसंगति (कथासंग्रह, दोन खंड -२००३)
  • समागम (कथासंग्रह -१९९६)
  • सामदाम दंड भेद (बालनाटक -२०११)

मृदुला गर्ग यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • ’उत्तर प्रदेश हिंदी संस्थान’चा साहित्य भूषण सन्मान
  • ’उसके हिस्से की धूप’ला मध्य प्रदेश साहित्य परिदेचा पुरस्कार (१९७५)
  • एक और अजनबी नाटकाला आकाशवाणीचा प्रथम पुरस्कार, 1978
  • ’जादू का कालीन’ला नाट्यलेखनाचा मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९३)
  • २००३ साली सुरीनाममध्ये झालेल्या जागतिक हिंदी संमेलनात मिळालेला जीवनगौरव साहित्य सेवा सन्मान
  • कठगुलाब या कादंबरीसाठी ज्ञानपीठाचा वाग्देवी पुरस्कार (२००३)
  • कठगुलाब या कादंबरीसाठी २००४ मध्ये व्यास सन्मान
  • ’मिलजुल मन’साठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३)
  • स्पंदन वरिष्ठ साहित्यकार सन्मान (२०१०)
  • हिंदी अकादमीचा १९८८ सालचा साहित्यकार सन्मान