मलिक-इ-मैदान

(मुलुख मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा)[१] ही निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावानेही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंडजस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर येथे ही तोफ गाळली होती.[२] या तोफेचे तोंड मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे. मलिक मैदान तोफेची लांबी १४ फूट ४ इंच असून तिचा व्यास ४ फूट ११ इंच आहे. निजामशाहीच्या उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली. सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्या शाह बुरुजावर ठेवण्यात आलेली आहे.

मलिक-इ-मैदान तोफ

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ र.रू. शाह. "अहमदनगर जिल्हा". २७ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ हेन्री हिन्टन. "व्ह्यू ऑफ द मलिक इ मैदान गन इन द फोर्ट ॲट बिजापूर" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-10-21. २७ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)