मुरूड
मुरूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक शहर आहे.
?मुरूड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अलिबाग , मुंबई |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ 0६ पेण |
मुरूड-जंजिरा किल्ला, समुद्र किनारा लाभला असल्याने विविध ठिकाणा वरून पर्यटक येतात मुरूडला येण्यासाठी मुंबई - पुण्यावरून अलिबाग रेवदंडा मार्गे येता येते तर रोहा वरून भालगाव, व केळघर मार्गे येता येते. इंदापूर - तळा - आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग 548A मुरूड तालुक्यातून जातो.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. येथे मोठ्या प्रमाणावर डोंगर भाग आहे
लोकजीवन
संपादनमुरूड तालुका पर्यटकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा तालुका आहे. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय, शेती, नारळी सुपारी यांचा बाग, मासेमारी याच्यावर येथिल लोकजीवन अवलंबून
प्रेक्षणीय स्थळे
संपादनमुरूड तालुका हा विविधतेने नटलेला तालुका आहे येथे फणसाड अभयारण्य , मुरूड समुद्र किनारा , काशिद समुद्र किनारा , नवाब राजवाडा, जंजीरा किल्ला , पद्मदुर्ग (कासा),
साळाव येथील बिर्ला समूहाचे गणपती मंदिर, नांदगाव येथे सिद्धीविनायक मंदिर , कोर्लई लाईट हाऊस , कोर्लई किल्ला तसेच पोर्तुगीज चर्च
नागरी सुविधा
संपादनमुरूड येते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे येथुन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी विविध हॉटेल , कॉटेज आहेत, मुरूडला पाणी पुवठ्यासाठी गारंभी व खाराआंबोली धरण येथून पाणी पुरवठा केला जातो. येथे तहसील कार्यालय, तालुका दिवाणी न्यायालय , पोलीस ठाणे , वन विभाग यांचे कार्यालय आहेत. आगरदांडा हे येथील बंदर आहे.
येथे वसंत राव नाईक कला महाविद्यालय , तसेच विविध शिक्षण संस्था आहेत. मुरूड येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहे व इतर खासगी रुग्णालय व दावाखाने आहेत
जवळपासची गावे
संपादनसाळाव , कोर्लई, बोर्ली, विहुर, काशिद, नांदगाव, माजगाव, राजपुरी, आगरदांडा, शिघ्रे, एकदरा, हजिफखार, मिठागर, भोईघर, महळूंगे, मांडला, फणसाड, सतिर्डे, येसदे, चोरढे, वाळके, सुपेगाव