मुकुंदराव पाटील
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा जन्म 4 डिसेंबर 1885ला झाला तर मृत्यू 20 डिसेंबर 1967 रोजी झाला. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते कृष्णराव भालेकरांनी आपला मुलगा बहिणीला दत्तक दिला. हा मुलगा म्हणजेच 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील. मुकुंदरावांनी 1910 मधे सोमठाने (ता.पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे दीनमित्रचे पुनरुज्जीवन केले.सत्यशोधक विचारांचा प्रसार करणाऱ्या या पत्राला कर्मठ ब्राह्मणांनी जोरदार विरोध केला. सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात या वृत्तपत्राची खुप महत्त्वाची भूमिका होती. सुरुवातीला सोमठाने व नंतर तरवडी यांसारख्या ग्रामीण भागातुन हे वृत्तपत्र प्रकाशित होत असल्यामुळे मुकुंदराव पाटील हे भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार मानले जातात
शिक्षण
संपादनत्यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यन्त झाले.
कार्य
संपादनदीनमित्र या नियतकालिकाचे 1910 साली त्यांनी पुनरुज्जीवन केले. जनकपिता कृष्णराव भालेकर यांना त्यांचा मृत्यूसमयी दिलेल्या वचनाप्रमाणे मुकुंदरावानी ते पत्र सुरू केले व सलग 57 वर्ष ग्रामीण भागातून प्रकाशित केले. हे आधुनिक भारतातील पहीले ग्रामीण नियतकालिक आहे.