मुकाम्बिका

हिंदू देवता

मुकाम्बिका हे देवीचे एक रूप आहे.

आख्यायिका संपादन

कर्नाटकात कोलन नावाच्या ऋषीचे वास्तव्य होते. ते शिवभक्त होते. तेथे असले्या शिवलिंगाची ते पूजा करीत असत. कामासुर नावाचा दानव त्यांच्या तपश्चर्येत विघ्ने आणीत असे. देवांनाही हा दानव डोईजड होईल असे वाटल्याने त्यांनी देवीला त्याचा बंदोबस्त कारायला सांगितले. देवीने कामासुराची वाचा बंद केली आणि तो मुकासुर झाला. अशा मुक्या कामासुराचा देवीने वध केला म्हणून तिला मुकाम्बिका म्हणू लागले.

कोलूरचे देउळ संपादन

कर्नाटकातल्या कोलूर गावी मुकाम्बिका देवीचे प्रसिद्ध देऊळ आहे. देवळाच्या पूर्व दरवाज्याजवळ अग्नितीर्थ नदी आहे. ही नदी सौपर्णिका नदीची एक शाखा आहे. देवळात दर्शनास जाणारे या नदीत अंघोळ करून मंदिरात प्रवेश करतात.

कोलूर गाव कर्नाटकातल्या कुडजाद्री पर्वताच्या टेकड्यांच्या परिसरात आहे. या पर्वतातून सौपर्णिकाशिवाय आणखी काही नद्या उगम पावतात. नद्यांवरचे अनेक धबधबे या भागात आहेत.

कोलूर हे ठिकाण कुंदापूरपासून ४५ किमीवर आणि उडुपीपासून ७० किमीवर आहे. भटकळ हे गाव कोलूरपासून ३०-३५ किमीवर आहे. रेल्वेने गेल्यास उडुपी येथे उतरून कर्नाटक राज्याच्या एस.टीने जाणे सोयीचे पडते.

देवळाचे वर्णन संपादन

मुकाम्बिका देवीचे हे मंदिर इसवी सनाच्या १०व्या शतकात बांधले गेले. ग्रेनाईटच्या दगडात बांधलेले हे देऊळ बैठ्या स्वरूपात आहे. मंदिराचा कळस दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरांना असतो तसा गोपुरासारखा द्राविड शैलीतला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंच दीपस्तंभ आणि ध्वजस्तंभ आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर लक्ष्मीमंडप लागतात. तेथे असलेल्या दगडी खांबांवर देवदेवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.

देवीची मूर्ती असलेलल्या गाभाऱ्याचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे आहे.