मुंबईचे नगरपाल हे वैधानिक दर्जा नसलेले परंतु प्रतिष्ठा असलेले पद आहे. नगरपालांची नियुक्ती राज्य सरकारमधील समिती करते. मुख्यमंत्री या समितीचे प्रमुख असतात. नगरपाल हे पद बिगर राजकीय क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येते. या पदाचा कार्यकाळ एक वर्षाकरिता असतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये नगरपाल यांचे कार्यालय असून न्यायालयाच्या वतीने समन्स बजाविणे, लिलाव करणे, परदेशी व्यक्तींचे स्वागत करणे आणि नामवंत व्यक्तींच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करणे असे नगरपालांचे कार्य असते.

जॉर्ज ख्रिस्तोफर मोल्सवर्थ बर्डवुड, १८४६ चे नगरपाल.

महादेव लक्ष्मण डहाणूकर हे मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होय. भारतातील मुंबईकोलकाता या दोनच शहरात नगरपाल हे पद आहे.

Caption text
नाव वर्ष टीपणी
जॉर्ज ख्रिस्तोफर मोल्सवर्थ बर्डवुड १८४६ एंग्लो-भारतीय अधिकारी, निसर्गवादी आणि लेखक
भाऊ दाजी लाड १८६९ चिकित्सक आणि शिक्षणतज्ज्ञ
भाऊ दाजी लाड १८७१ चिकित्सक आणि शिक्षणतज्ज्ञ