मिलिंद जोशी (संगीतकार)

मिलिंद जोशी हे एक कवी, संगीतकार आणि चित्रकार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबादला झाले. पुण्यात येऊन त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट या विषयाचे तर राम माटे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे, आणि फैयाज हुसैन खान यांच्याकडून गझल गायकीचे शिक्षण घेतले. चित्रकलेच्या फायनल परीक्षेसाठी ते मुंबईला (जे.जे. स्कूल ऑफ आर्ट) येथे आले आणि मुंबईतच रमले. मुंबईत त्यांनी संगीतकार यशवंत देव यांच्याकडून शब्दप्रधान गायकीचे शिक्षण घेतले.

त्यांनी अनेक मराठी गझला संगीतबद्ध केल्या आहेत.

मिलिंद जोशी यांनी चाळिसाहून अधिक दूरचित्रवाणी मालिकांना पार्श्वसंगीत किंवा त्यांच्या शीर्षक गीतांना संगीत दिले आहे

मिलिंद जोशी यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका, वगैरे संपादन

  • अशाच एका बेटावर (चित्रपट)
  • कळ्यांचे दिवस फुलांच्या (भावगीत; कवयित्री - शांता शेळके, गायिका - मनीषा जोशी)
  • गेट वेल सून (नाटक)
  • गोळाबेरीज (चित्रपट)
  • जगासारखं जगणं मला पटत नाही (झी मराठीवरील नायक या दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षक गीत, कवी - नितीन आखवे, गायक - सुधीर बर्वे)
  • टाॅम ॲन्ड जेरी (नाटक)
  • ठष्ट (नाटक)
  • डिअर आजो (नाटक)
  • बिनधास्त (चित्रपट) (सह-संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की)
  • मेट इन चायना (चित्रपट) : या चित्रपटाला मुंबईत झालेल्या स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात 'सर्वोकृष्ट मराठी चित्रपटा'चा पुरस्कार मिळाला.
  • शेंटिमेंटल (चित्रपट)
  • सखे गं सये गाऊ आता आनंदाची गाणी (झी मराठीवरील अंकुर या दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षक गीत, गायिका मनीषा जोशी)