मालिनी (वृत्त)
अक्षरगण वृत्त
(मालिनी या पानावरून पुनर्निर्देशित)
मालिनी हे संस्कृत-मराठीत आणि अन्य भारतीय भाषांतील काव्यांत वापरात असलेले अक्षरगणवृत्त आहे. या कविते(काव्या)च्या प्रत्येक कडव्यात चार चरण (ओळी) असून प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. या १५ अक्षरांचे तीनतीनचे गट केले तर न,न,म,य,य, असे गण पडतात. प्रत्येक ओळीतली यती ८व्या अक्षरावर असतो.
ह्या वृत्ताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :
न | न | म | य | य |
---|---|---|---|---|
ल ल ल | ल ल ल | गा गा गा | ल गा गा | ल गा गा |
१ १ १ | १ १ १ | २ २ २ | १ २ २ | १ २ २ |
वृत्ताची लक्षणगीते
संपादन- ननमयय गणांनी मालिनी वृत्त होते ।
- नमन नमन मानावा यमाचा यमाचा ।
- म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हा ॥
न न म य य असे हे संघ येतात जेव्हा ॥
प्रतिचरणिहि पंध्रा अक्षरे ही तयाची ॥
हरिहर - चरणांला आपुले हीत याची ॥
- न-न-मयययुतेयं मालिनी भोगिलोकैः । (संस्कृत)
- ननमयय भएमा मालिनी छन्द भन्छन् । (नेपाळी भाषा)
मालिनी वृत्तात लिहिलेल्या कविता
संपादन- समर्थ रामदासांची करुणाष्टके (अनुदिन अनुतापे तापलो रामराया,...)
- पंगतीत भोजनापूर्वी म्हटल्या जाणारा श्लोक : 'वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे'
- प्रथम घर कला का व्यास की पाठशाला (हिंदी)
- तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती.
जलदहि जलभारे खालती फार येती ॥
(शाकुंतल नाटक - गोविंद बल्लाळ देवल)
- मालिनी वृत्तात लिहिलेली ग्रेस यांची कविता :
कणभर उरलेले रूप माझे उरी घे
मधुतर जळवंती हात माझे करी घे
तनुभर जमलेली रात्र घेना मिठीला
क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला
बाह्य दुवे
संपादनhttp://www.manogat.com/node/383 Archived 2005-05-23 at the Wayback Machine.