एलिनोर मार्गारेट बर्बिज या ब्रिटिश-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होत्या

मार्गारेट बर्बिज
जन्म १२ ऑगस्ट १९१९ (1919-08-12)
डॅव्हेनपोर्ट, स्टॉकपोर्ट, युनायटेड किंग्डम
मृत्यू ५ एप्रिल, २०२० (वय १००)
सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र

१९४४ मध्ये दुसरे महायुद्ध पूर्ण भरात असताना त्यांनी लंडन विद्यापीठातून विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली.

ज्यावेळी उत्तर फ्रान्समधून उड्डाण करणारे जर्मन लुफ्तवाफे विमाने लंडनवर अविरत आग ओतत होते, त्यावेळी मार्गारेट बर्बीज (Margaret Burbidge), हॅम्पस्टीड हेथमधील तिच्या निवासस्थानापासून मिल हिल पार्कच्या वेधशाळेला जीव मुठीत घेऊन जात असत. एकदा तर एका बॉम्बचा त्यांच्या वेधशाळेजवळच स्फोट झाला आणि ती काम करत असलेल्या दुर्बीणीची अपरीमीत हानी झाली.

युद्धानंतरच्या शांततेत काम करणे सुलभ झाले पण इतरही काही समस्या होत्या. दक्षिणी कॅलिफोर्नियामधील 100 इंचाच्या माउंट विल्सन टेलीस्कोपवर काम करण्याचा त्यांचा अर्ज नाकारला गेला कारण वेधशाळेतील सुविधांमध्ये महिलांचे प्रसाधनगृह नव्हते. मार्गारेट बर्बीज यांनी आणखी एका नामांकित खगोलशास्त्रज्ञ, जेफ्री बर्बीज यांच्याशी लग्न केले आणि दोघांनीही आपल्या खगोलशास्त्राच्या संशोधन कार्यासाठी अमेरिकेला स्थलांतर केले. १९५७ मध्ये, बर्बीज पती-पत्नींनी विल्यम फॉलर आणि फ्रेड हॉइल यांच्या सोबत काम करून "रीव्हिवज ऑफ मॉर्डन फिजिक्स" या मासिकात एक विस्तृत लेख प्रसिद्ध केला. ताऱ्यांमध्ये विविध रासायनिक घटक कसे तयार होतात याबद्दल तपशीलवार वर्णन या लेखात केले होते. आपल्या १०० पानी अहवालात त्यांनी ताऱ्यांच्या नाभिकीय प्रक्रियेमध्ये, अत्यंत हलक्या अशा ड्युटेरीयमचे अणू सोडले तर इतर सर्व प्रकारच्या अणूंची निर्मिती होते असे सिद्ध केले. हा अहवाल B2FH अहवाल म्हणून जगप्रसिद्ध आहे. बर्बिज पती-पत्नींना B2 म्हणूनही ओळखले जाई.

मार्गारेट एक चांगली निरीक्षक आणि वादक होती, तसेच तिचे पती जेफ्री एक चांगले सिद्धांतज्ञ होते, त्यामुळेच त्यांची जोडी खगोलशास्त्राच्या अभ्यासात चांगलीच जमली. जेफ्री आपली भूमिका आक्रमकपणे मांडत तर मार्गारेट आपली भूमिका सौम्य पण ठामपणे मांडत. अनेक चर्चासत्रांच्यावेळी कितीही पूरावे दिले तरी मार्गारेट यांचे मन वळवणे अवघड असल्याचे त्यांचे विरोधक म्हणत.

मार्गारेट अनेक वेळा भारतात आली होता. बंगलोर आणि पुणे ही तिची आवडती शहरे होती. पुण्याच्या "इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स" (IUCAA) द्वारा आयोजित अनेक कार्यशाळांत ती सहभागी झाली होती. कार्यशाळेत निरीक्षणे आणि उपकरणे यासंबंधी महत्त्वाची माहिती त्यांनी पुरवली, ज्यामुळे या क्षेत्रातील अनेकांना भविष्यातील प्रयोगांना मार्गदर्शन होण्यास मदत झाली. पुढे मार्गारेट आययूसीएएच्या प्रतिष्ठित सन्मानित सभासद बनल्या. आययूसीएएच्या लोकविज्ञान प्रसाराच्या कामातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तिच्या संशोधनातील आणि शैक्षणिक कार्यामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये तिला रॉयल ग्रीनविच वेधशाळेचे संचालक (आरजीओ) बनविण्यात आले. जरी हा एक चांगला सन्मान होता, परंतु तो पूर्ण दिला गेला नाही म्हणून त्यावर टीका झाली. एरवी परंपरेप्रमाणे जी व्यक्ती आरजीओच्या संचालक पदी नियुक्त होते तिला अ‍ॅस्ट्रॉनॉमर रॉयल हा सन्मानही बहाल करण्यात येतो. पण १९७२ पासून हा नियम बदलण्यात येऊन दोन स्वतंत्र व्यक्तींना हा सन्मान देण्याचे ठरवण्यात आले आणि तो सन्मान सर मार्टीन राईल यांना देण्यात आला. यानिर्णयामुळे मार्गारेट नाखुश झाल्या. आरजीओचे संचालकपदाचे कामकाज अत्यंत कारकूनी स्वरूपाचे असल्याने आणि इंग्लंडचे वातावरण वेधशाळेच्या निरीक्षण कामासाठी प्रतिकूल असल्याने, लकरच या पदाचा राजीनामा देऊन त्या कॅलिफोर्नियाला रवाना झाल्या.

मार्गारेट बर्बीज यांना हेन्री नॉरिस रसेल पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्कारासाठी व्यक्ती उत्तम व्याख्याती असणे आवश्यक होते. लैंगिक भेदभाव करणाऱ्या पुरस्काराबाबत ती संवेदनशील होती. तिला अ‍ॅनी कॅनन पुरस्कार देण्यात आला, जो केवळ महिलांसाठी होता. तिला असे वाटायचे की अशा पुरस्कारांनी पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एक लिंग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची धारणा निर्माण होऊ शकते. ती स्त्री-पुरुष समानतेसाठी सतत लढत राहिली.

मार्गारेट बर्बीज खगोलशास्त्रज्ञांच्या जुन्या शैलीचा वापर करीत. पूर्वीच्या काळात निरीक्षकास अस्तित्वात असलेला सिद्धांत योग्य आहे की चूक आहे हे ठरवण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत. आधुनिक निरीक्षक त्यांचे नवीन संशोधन योग्य आहे असे गृहीत धरतात आणि त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी दुर्बिणीतून केलेले निरीक्षणाचा आधार घेतात.[१]

  1. ^ Narlikar, Jayant. "Star scientist". Frontline (इंग्रजी भाषेत). 2020-05-18 रोजी पाहिले.