माधवी ओगले (जन्म १३ एप्रिल १९५४ - मृत्यू ६ ऑक्टोबर २००७) या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या आहेत. बहुविकलांग आणि दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी योगदान दिले आहे.[१]

कौटुंबिक माहिती संपादन

माधवी ओगले यांचे वडील वसंत मनोहर हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते आणि आई वसुधा या शाळेत शिक्षिका होत्या. डॉ. मधुसूदन ओगले यांच्याशी २६ नोव्हेंबर १९७८ रोजी त्यांचा विवाह झाला. डॉ. ओगले हे रेडिओलॉजिस्ट होते. सौदी अरेबियायेथून त्यांना तेथे नोकरीचा प्रस्ताव आला आणि त्यांनी तो स्वीकारला. त्या निमित्ताने माधवी ओगले यांना सौदीला भेट देण्याची संधी मिळाली.[१]

शैक्षणिक अर्हता संपादन

निसर्गोपचार विषयातील पदवी

जीवनकार्य संपादन

कालांतराने ओगले यांची मुले मोठी झाल्यावर विद्याज्योती शाळेमध्ये त्या हिशेब तपासणीचे काम करण्यासाठी जात असत. तिथेच त्यांची ओळख पद्माताईं गोडबोले यांच्याशी झाली. पद्माताईंनी अध्ययन-अक्षमता या विषयाचा अभ्यास केला होता. परदेशात त्यांनी विशेष मुलांच्या शिक्षणाच्या शाळेत काम केले होते. त्यांना पुण्यात तशा पद्धतीची शाळा सुरू करण्याची इचछा होती. पद्माताई व माधवी या दोघींनी प्रयत्न करून ७ जणांचा ट्रस्ट स्थापन करून १ जून १९९० रोजी प्रिझम फाउण्डेशन ही संस्था स्थापन केली.[२] प्रथम या संस्थेची गतिमंद मुलांच्या विशेष शिक्षणासाठी फिनिक्स ही शाळा सुरू केली.[२] पुण्यात अशा प्रकारची सुरू झालेली ही पहिली शाळा ठरली. शाळेची शैक्षणिक बाजू पद्माताईंनी सांभाळली व संस्थेची खजिनदार या नात्याने आर्थिक व्यवहार माधवी ओगले यांनी काम बघितले. पहिल्या वर्षातल्या अनुभवानंतर बहुविकलांगत्व असलेल्या मुलांकरिता म्हणून लगेच दुसऱ्या वर्षी ‘लार्क’ शाळेची स्थापना झाली.१९९५ मध्ये इंडियन लॉ सोसायटीची मोकळी जागा ९९ वर्षाच्या भाडेकरारावर मिळाली. जागेवर तात्पुरत्या ८ खोल्या बांधून ‘फिनिक्स’ व ‘लार्क’ अशा दोन्ही संस्थाचे काम सुरू झाले.सदर संस्थेची विश्‍वस्त व खजिनदार म्हणूनही ओगले यांनी काम पाहिले आहे.[१]

  • संस्थेच्या कामाची व्याप्ती-

विशेष मुलांच्या शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण माधवी यांनी घेतले नसल्याने या विषयातील पुढील शिक्षण त्यांनी चेन्नई येथे घेतले. फिनिक्स आणि लार्क शाळेतील शिकून बाहेर पडलेल्या मुलांसाठी व्यावसायिक शिक्षण देणारी शाळा प्रिझम संस्थेत १८ ते २५ वयोगटाच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू झाली आणि ७ जुलै १९९८ रोजी ‘प्रिझम पूर्वव्यावसायिक शाळा’ या नावाची तिसरी शाळा कार्यान्वित झाली. या शाळेत माधवी यांनी मुख्याध्यापक म्हणून३ वर्षे काम पाहिले. मुलांचे व पालकांचे समुपदेशन करणे, कॅनिंग, चक्की व बेकरी आदि विभागांचे काम सुरू होणे, फाईल्स तयार करणे, स्क्रिनप्रिंटींग, पाकिटे बनविणे, शिवणकाम, मेणबत्या बनविणे, फिनेल-लिक्वीड सोप तयार करणे हे उद्योग केले जात असत.या शाळेतील मुलांना कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे.संस्थेमार्फत पालक व शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जात असत.[१]

निधन संपादन

त्यांचे ६ ऑक्टोबर २००७ रोजी हृदयरोगाने निधन झाले.[३]

संदर्भ संपादन

-

  1. ^ a b c d ओगले- मुळे, मंजिरी (२०. ६. २०१०). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्र कोश,विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड. पुणे: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था). pp. ४१५-४१६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b ओक, श्रीराम (२९. ५. २०१९). "सेवाध्यास : 'विशेष' मुलांच्या 'विशेष' शिक्षणासाठी". लोकसत्ता. ५. ३. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ ओगले-मुळे, मंजिरी. "ओगले, माधवी मधुसूदन". महाराष्ट्र नायक. ५. ३. २०२० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)