माझी कन्या भाग्यश्री योजना
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र | माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ | शासकीय अनुदान योजना
महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली, या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शक्षण व आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीचे नकारत्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने राज्यात 2014 मध्ये सुकन्या योजना सुरू करण्यात आली आहे, सुकन्या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींना करिता लागू आहेत.
याच प्रमाणे केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ ही योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरू केली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, यानंतर सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली. वाचक मित्रहो या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत, यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, शासनाचा निर्णय, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहित आपण या लाखामध्ये पाहणार आहोत.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२२ संपूर्ण माहिती
संपादनमहाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला, ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे आशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे.
या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार द्वारा बँक मध्ये जमा केले जाईल, त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या मत किंवा पित्याने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे, त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/--25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनच या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेच्या अंतर्गत सुरुवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२२ महाराष्ट्र उद्दिष्टे
संपादनमहाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारत्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीस प्रतिबंध घालणे तसेच मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये परंपरेनुसार मालाच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतु मुलींच्या जन्मानंतर असे घडत नाही, जनमानसाची ही मुलींबद्दलची मानसिकता बदलविणे आणि त्यांना मुलींचे योग्य पालनपोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीद्वारे मुलीनी आपले शक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढे निर्माण होणारी मातांची पिढी ही शिक्षित होईल आणि त्यामुळे पुढे येणारी त्यांची मुले व मुली आरोग्यसंपन आणि शिक्षित निर्माण होईल व त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल हा शासनाचा उद्देश आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश राज्यातील विषम लिंगअनुपात सुधारणे त्याच बरोबर मुलींचे प्रमाण वाढविणे, आणि तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये या आर्थिक मदतीचा उपयोग करता येईल, या योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षित आणि स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश शासनाचा आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे आणखी काही उद्देश
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे
- बालिकांचा जन्मदर वाढविणे
- मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
- मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
- सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
- जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम
संपादनसुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे
- या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे
- योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करतांना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील
- या योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मिळणारी डीपॉझीट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीतकमी दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
- ही योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल, त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना लागू राहील.
- या योजनेमध्ये दोन प्रकारामध्ये योजनेचा लाभ मिळविता येतो एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबामध्ये मातेने किंवा पित्याने परिवार नियोजन करणे आणि तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये दोन अपत्यांच्या जन्मानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थींचे खाते जनधन योजनेंतर्गत आहे त्यांना जनधन योजनेंतर्गत असणारे लाभ आपोआप मिळू शकतील, ही योजना आधारसोबत जोडण्यात येईल
- योजनेच्या ठराविक मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा मुलगी दहावी उतीर्ण नसल्यास या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना होणार नाही आणि मुलीच्या नवे बँक खात्यामध्ये असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या खात्यामध्ये जमा होईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 सुधारित या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील. परंतु ज्या परिवारामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता किंवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25,000/- इतका योजनेचा लाभ देय राहील.
- ज्या परिवारामध्ये पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय राहील, परंतु तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक किंवा दोन अपत्यांचे लाभही बंद होतील.
- या योजांच्या अंतर्गत जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला तर मुलीच्या नावाने गुंतविण्यात आलेली मुदत ठेवीची रक्कम ठराविक मुदत संपल्यानंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल.
- या योजनेमध्ये प्रत्येक मुलीच्या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल, तसेच मुलीच्या नवे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची झेरॉक्स शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी.
- योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मुलीला मिळणारी एक लाख विम्याची रक्कम या धनराशीतून किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करण्यात यावी, जेणेकरून मुलीला कायमस्वरूपी स्वावलंबी होता येईल.
- ज्या कुटुंबाला एका मुलीच्या जन्मानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचा प्रमाणपत्र संबंधित शासनच्या अधिकाऱ्या कडे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी दोन मुलींनंतर सहा महिन्याच्या आत परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, ते या योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र राहतील. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अर्ज करण्याची प्रक्रिया
संपादनमहाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट/Official Website वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा एप्लिकेशन फॉर्म PDF [Application form PDF] डाऊनलोड करावा लागेल, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाइल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल, अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
वाचकहो या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला आणखी या योजनेबद्दल माहिती जाणून घायची असल्यास आपण योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता, माझी कन्या भाग्यश्री ही महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, राज्यातील नागरिकांनी मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा. आणि या योजनेबद्दल जास्तीत जास्त पालकांना जागरूक करावे.