माझा गाव (पुस्तक)
माझा गाव (पुस्तक) | |
लेखक | रणजित देसाई |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | ४ जानेवारी १९८६ |
चालू आवृत्ती | जानेवारी, २००८ |
मुखपृष्ठकार | सुभाष अवचट |
पृष्ठसंख्या | ३१२ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-०६४-० |
पुस्तकाविषयी
संपादनत्या काळातील ग्रामीण माणूस कसा राहत होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध, गावाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन ‘माझा गाव’ मधून होतं.
हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होऊ लागले आणि त्याजागी कोणत्याच उच्च मुल्यांची स्थापना न झाल्यामुळे समाजाच्या विविध घटकांत बेबनाव वाढत गेला. स्वार्थीपणा आणि भाऊबंदकी यामुळे माणसातील माणुसकीचा लोप होऊ लागला. म्हणूनच जुन्या परंपरांमधील चांगुलपणाचे गुणगान करण्याची एक मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. यातूनच ‘माझा गाव’ची निर्मीती झाली आहे.
या कादंबरीतले प्रत्येक पात्र जिवंत आहे, स्वाभाविक वाटणारे आहे. खेड्यातील पाटील-कुलकर्णी एकत्र आल्यावर गावाच्या उद्धारासाठी बरेच काही घडू शकते आणि पुर्वीच्या काळी ते घडतही होते. याचा परिचय करून देणारी एक ह्रद्य कादंबरी. जुन्या पिढीतील परोपकारी व बुद्धीमान असे तात्या कुलकर्णी आणि गावावर जिवापाड प्रेम करणारे आप्पासाहेब इनामदार यांच्या परस्पर संबंधातून कादंबरीचे कथानक फुलत जाते. आजच्या संकुचित, स्वतःपुरते पाहणाऱ्या मानसिकतेमुळे होणाऱ्या सामाजिक ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर आजही ह्या कादंबरीचे महत्त्व अधिक आहे.