माऊली (चित्रपट)

२०१८ मध्ये भारतीय चित्रपट


माऊली हा २०१८ सालचा मराठी भाषेतील मारामारीपट आहे. तो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आहे आणि जेनेलिया देशमुख निर्मित आहे.[] क्षितीज पटवर्धन यांनी ह्या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटात संयमी खेरसह रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत आहेत.[][] हा सिनेमा २०१४ मधील 'लई भारी' या चित्रपटाचा सिक्वल नाही. सुरुवातीला हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार होता पण शाहरुख खान अभिनीत झिरो या चित्रपटाशी झगडा टाळण्यासाठी तो बदलून १४ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला.[] माउली चित्रपटाला सुपरहिट म्हणून घोषित केले गेले. हा फक्त ५०० ठिकाणीच प्रदर्शित करण्यात आला. याने त्याच्या गुंतवणूकीच्या दुप्पट कमाई केली.

माऊली
चित्र:Mauli poster.jpg
दिग्दर्शन आदित्य सरपोतदार
निर्मिती जेनेलिया डिसूझा
कथा क्षितीज पटवर्धन
प्रमुख कलाकार रितेश देशमुख
संयमी खेर
संकलन संजय संकला
छाया अमलेंदु चौधरी
संगीत अजय-अतुल
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित साचा:Film date
वितरक जिओ स्टुडिओ
निर्मिती खर्च १० कोटी
एकूण उत्पन्न २६ कोटी


कथानक

संपादन

माऊली आणि प्रिन्स (रितेश देशमुख) हे जुळे भाऊ आहेत. माऊली शूर आणि धैर्यवान आहेत, तर प्रिन्स त्याच्या एकदम विरुद्ध आहे. जेव्हा प्रिन्सला मारहाण केली जाते तेव्हा माऊली सूड घेतो. आणि प्रिन्स या गोष्टीचे सर्व श्रेय (माऊली म्हणून) घेतो. त्यांचे जीवन कायमचे बदलते जेव्हा ते एका गावात जातात. त्या गावात कोणताही कायदा नसतो आणि संपूर्ण गाव नाना (जितेंद्र जोशी) या एका शक्तिशाली गुंडाला घाबरून असतो. जेव्हा माऊली नानासाठी रस्त्यातला काटा ठरतो तेव्हा नाना त्याला मारून टाकतो. यानंतर त्याचा भाऊ, प्रिन्स, एकटा पडतो. एकटा माऊली (प्रिन्स) गाव कसा वाचवतो आणि नानाचा सूड घेतो ही बाकीची कहाणी आहे.

कलाकार

संपादन
  • पोलीस निरीक्षक माऊली सर्जेराव देशमुख आणि राजकुमार म्हणून रितेश देशमुख (डबल रोल)
  • रेणुका म्हणून संयमी खेर
  • जितेंद्र जोशी नाना लोंढे ऊर्फ धरमराज
  • भानुदास थुपे म्हणून विजय निकम
  • गिरीजा ओक माऊलीची आई म्हणून
  • सिद्धार्थ जाधव कडकनाथ म्हणून
  • "धुवुन टाक" गाण्यातील जेनेलिया डिसोझा

संगीत

संपादन

या चित्रपटाला अजय - अतुल यांनी संगीतबद्ध केले होते आणि मुंबई फिल्म कंपनीने ते प्रदर्शित केले होते. पार्श्वसंगीत ट्रॉय-आरिफ यांनी केलेले आहे. हेडरूम स्टुडिओमध्ये बॅकग्राउंड मिक्सिंग वत्सल शेवली आणि अफताबने केले आहे.

माऊली
साउंडट्रॅक द्वारे
अजय - अतुल
प्रदर्शित 18 December 2018[]
ध्वनीबध्द 2018
शैली Soundtrack
लांबी 21:53
फीत Mumbai Film Company
No.TitleLength

बाह्यदुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ritesh Deshmukh on Saiyami Kher in Mauli: She fits the character of a fire brand Marathi mulgi". The Indian Express. 7 May 2018. 29 November 2018 रोजी पाहिले.
  2. ^ Khandelwal, Khush (29 November 2018). "Mauli trailer out! Shah Rukh Khan and Salman Khan applaud Riteish Deshmukh's Marathi act". Times Now. 29 November 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "'हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसर नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय'". Lok Satta (Marathi भाषेत). 28 November 2018. 29 November 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "'Mauli' trailer: Riteish Deshmukh plays a swaggering police officer". Scroll.in. 8 November 2018. 29 November 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Mauli - Original Motion Picture Soundtrack". Saavn.