माइक पेन्स
युनायटेड स्टेट्सचे ४८वे उपाध्यक्ष
मायकेल रिचर्ड पेन्स (इंग्लिश: Michael Richard "Mike" Pence; ७ जून, १९५९:कोलंबस, इंडियाना, अमेरिका - ) हा एक अमेरिकन राजकारणी व देशाचा भूतपूर्व उपराष्ट्राध्यक्ष आहे. २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्पबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. ह्या लढतीत ट्रम्प-पेन्सने डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन-टिम केनला अनपेक्षितरीत्या हरविले. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी पेन्स २०१३ ते २०१७ दरम्यान इंडियाना राज्याचा गव्हर्नर तर २००१ ते २०१३ दरम्यान प्रतिनिधींचे सभागृहाचा सदस्य होता.
माइक पेन्स Mike Pence | |
अमेरिकेचा ४८वा उपराष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २० जानेवारी २०१७ – २० जानेवारी २०२१ | |
राष्ट्राध्यक्ष | डॉनल्ड ट्रम्प |
---|---|
मागील | ज्यो बायडेन |
पुढील | कमला हॅरिस |
इंडियाना राज्याचा गव्हर्नर
| |
कार्यकाळ १३ जानेवारी २०१३ – ९ जानेवारी २०१७ | |
प्रतिनिधींचे सभागृहाचा सदस्य
| |
कार्यकाळ ३ जानेवारी २००१ – ३ जानेवारी २०१३ | |
जन्म | ७ जून, १९५९ कोलंबस, इंडियाना |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
एक कट्टर पुराणमतवादी मानला जाणारा पेन्स समलिंगी विवाह, गर्भपात इत्यादींच्या विरोधात आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत