मांडे हा महाराष्ट्रातील एक खाण्याचा गोडसर पदार्थ आहे. बेळगाव भागातील मांडे विशेष प्रसिद्ध आहेत.

मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले अशी आख्यायिका आहे. मांडे तूप, दुध, पिठीसाखर सोबत खातात.मांडे गहुच्या पिठाचे व मैद्याचे पन बनवतात मांडे हाडी सारख्या मोठया भांड्यावरती करतात.

मळण्यासाठी साहित्य -

३ कप मैदा, पाऊण कप दूध, २ चमचे तूप

सारणाचे साहित्य -

२ कप पिठीसाखर , अर्धा ते पाऊण कप पोह्याची पूड , १/२ कप भाजलेले तीळ , १२-१४ वेलची ...पूड केलेली

तळ्ण्यासाठी- तूप
कृती -

मैदा, दूध, तूप एकत्र करा आणि घट्ट मळून घ्या. सारणाचे साहित्य एकत्र मिसळून घ्या. मैद्याच्या पात़ळ पुऱ्या लाटून घ्या. (साधारण १२ सेमी व्यासाच्या. पुऱ्या खूप मोठ्या लाटल्यास तळ्ण्यासाठी मोठी कढई घ्यावी लागेल आणि मग तेल / तूप ही जास्त घालावे लागेल. पुऱ्या पातळच लाटाव्यात.) तूप गरम झाल्यावर पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या फार कुरकुरीत आणि लाल तपकीरी नकोत. मऊ आणि पांढऱ्याच राहिल्या पाहिजेत. त्यांमुळे जास्त वेळ तळू नये. कढईतून पटकन बाहेर काढून गरम असतानाच पीठीसाखरेचे सारण २ चमचे त्यावर पसरवा. सारण अर्ध्या भागावरच पसरावे. मग पुरीची अर्धी घडी घालावी. आता परत अर्ध्या भागावर १/२ ते १ चमचा सारण पसरावे आणि परत अर्धी घडी घालावी. असे त्रिकोणी आकारातील मांडे थाळीत एकावर एक न ठेवता वेगवेगळे मांडून ठेवावेत.

टीप - सारण गरम गरम पुरीवरच पसरावे. म्हणजे पीठीसाखर व्यवस्थित पुऱ्याना चिकटते.

पोह्याची पूड करण्यासाठी पोहे थोडेसे भा़जून घेऊन गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडीभरडी पूड करा. मांडे गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ७-८ दिवस चांगले राहातात.

साहित्य संस्कृतीतील उल्लेख

संपादन

मांडे खाण्याची मुक्ताबाईची इच्छा पूर्ण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी योगाग्नीने आपली पाठ गरम केली व मुक्ताबाईने त्यावर मांडे भाजले अशी कथा वारकरी संप्रदायात सांगितले जाते. या कथेचे वर्णन करताना एकनाथ म्हणतात.

बोले माऊली रडू नको मुक्ता देतो तुला तापवुनी तवा |
जठ राजाला हुकुम केला, जठ अग्नी धावोनी आला ||
घेई पाठीवरी भाजोनी मांडे, विठ्ठल विठ्ठल डोलू लागला |

संदर्भ

संपादन