महिला बचत गट
महिला बचत गट तथा स्वयंसहाय्य गट हा एक सामाजिक आणि आर्थिक उपक्रम आहे ज्यामध्ये महिलांचा समूह एकत्र येऊन नियमितपणे बचत करतो आणि आपसांत निधीची देवाणघेवाण करतो. या गटांद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याची संधी मिळते आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. महिला बचत गट हे सामान्यतः ग्रामीण आणि निमशहरी भागात अधिक प्रभावी ठरतात. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. बचत गट दोन प्रकारचे असतात, १. नोंदणीकृत २. अनोंदणीकृत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नोंदणीकृत
संपादननोंदणीकृत बचत गटांची नोंदणी ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका आधी स्वायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी नाबार्ड महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळी व अशासकीय संस्था येथे केली जाते. शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
अनोंदणीकृत
संपादनया बचत गटांमध्ये सर्व बाबी आलेल्या बचतवर अवलंबून असतात. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणून बचत गट नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर काही बचत गट दारिद्रय रेषेखालील असतात तर काही APL मध्ये असतात. दारिद्रय रेषेखालील बचत गटांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत असतो.
कार्यप्रणाली
संपादनमहिला बचत गट नियमितपणे सदस्यांच्या बचतीचे संकलन करतात आणि जमा झालेल्या रकमेचा वापर विविध उपक्रमांसाठी करतात. हे उपक्रम काहीतरी व्यवसाय सुरू करणे, लहान उद्योग उभारणे, शेतीशी संबंधित उपकरणे खरेदी करणे, किंवा आणखी काही आर्थिक क्रियाकलाप असू शकतात. बचत गटाच्या सदस्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखील असते.
बचत गटाचे फायदे
संपादन- दरमहा बचत होते. व्यवसाय स्थापन करण्यासाठी कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध होते.
- बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध होतो.
- तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमची बचत वापरायला घेऊ शकता.
- एकाच घरातील अधिक सदस्य बचत गटात सहभागी होऊ शकतात.
महिला बचत गट हे ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे साधन आहे. हे गट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला वर्धित करतात, आणि त्यांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यामुळे संपूर्ण समाजाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होतो.