महिला आर्थिक विकास महामंडळ

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारे एक मंडळ असून याची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी करण्यात आली. २० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने माविम ला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीच्या विविध योजना राबविण्यासाठीची एक नोडल संस्था म्हणून घोषित केले.

ध्येय

संपादन

मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देणे, हे माविमचे मिशन आहे. माविमची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन करणे.
  2. महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन करणे.
  3. महिलांमधील आत्मविश्र्वास वृद्धीगंत करणे.
  4. महिलांचा उद्योजकीय विकास करणे.
  5. रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठांमध्ये समन्वय निर्माण करणे.
  6. समान संधी, समृद्धता आणि शासनामध्ये महिलांनी स्वतःहून सहभाग घ्यावा याकरिता त्यांना प्रोत्साहन देणे.
  7. शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून एस एच जी सोबत तळागाळात काम करणाऱ्या संस्था निर्माण करणे.

संदर्भ

संपादन