राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विभागांचे मंत्री, विधानमंडळाचे विरोधी पक्ष नेते व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मोटारींना...
लाल दिवा (फ्लॅशरविना)
विधानसभा उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त.यांच्या मोटारींना.
अंबर दिवा (फ्लॅशरविना)
अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक व त्या पदावरील समकक्ष अधिकारी आणि आपल्याच कार्यक्षेत्रात वावरणारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, 'अ' व 'ब' वर्ग महानगरपालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक व विभागीय आयुक्त..
अंबर दिवा (फ्लॅशरसह)
शासकीय, निमशासकीय सेवेतील वाहने.
निळा दिवा
कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना, पोलिसांच्या वाहनांना.
जांभळ्या काचेतील लुकलुकणारा लाल दिवा
रुग्णवाहिकेसाठी.
लाल, निळा व पांढरा असा बहुविध रंगाचा दिवा
आपत्कालीन व्यवस्थेतील व आणीबाणी व्यवस्थापनासाठीच्या वाहनांना.