महाबलीपुरम लेणी

जागतिक वारसा असलेली लेणी
(महाबलीपुरम लेणी मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

महाबलीपुरम लेणी भारतातील चेन्नई शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहेत.[]

महाबलीपुरम दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र समजले जाते. पुराण प्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपुरम हे नाव मिळाले. मम्मलापूर असेही याचे एक प्राचीन नाव आहे.[]

भौगोलिक महत्त्व

संपादन

हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. पहिल्या व दुसऱ्या शतकातील ग्रीक व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो. तमिळ काव्यातही या बंदराचा उल्लेख आहे. प्राचीन काळी त्याला मलंगे व कदलमललई ही नावे होती.

सांस्कृतिक महत्त्व

संपादन

इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात पल्लव वंशाच्या राजवटीत इथे अनेक शिल्पे निर्माण झाली.[][] अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे.[] इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे. या गुंफेत गोवर्धन धारी श्रीकृष्ण व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत. या गुंफेजवळ पंच पांडव रथ आहेत. मुख्य रथाला धर्मराज रथ म्हणले जाते. [] कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे. या मंदिरासमोरच वराहमंडप आहे. त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.[] या गावात टेकडीवर एक शिव मंदिर आहे. त्याला ओलक्कनाथाचे मंदिर म्हणतात. ते दगडाचे बांधलेले असून इतके उंच आहे की पूर्वी ते दीपगृहाचे काम करीत असावे. चित्रे = पंच पांडव काही अंतरावर १०० फूट लांब व ३० फूट रुंद उंच अशा एका प्रचंड खडकावर कोरलेली अनेक चित्रे आहेत. नाग, नागिण, जटाधारी पुरुष, अर्जुन, हत्ती, वाघ, सिंह, यक्ष, गंधर्व, सूर्य, अप्सरा यांची चित्रे कोरलेली आहेत.

चित्रदालन

संपादन
  1. ^ Nākacāmi, Irāmaccantiran̲ (2008). Mahabalipuram (Mamallapuram) (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195693737.
  2. ^ Singh, Upinder (2008). A History of Ancient and Early Medieval India: From the Stone Age to the 12th Century (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 9788131711200.
  3. ^ Kapoor, Subodh (2002). The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 9788177552720.
  4. ^ Lockwood, Michael; Siromoney, Gift; Dayanandan, P. (1974). Mahabalipuram Studies (इंग्रजी भाषेत). Christian Literature Society.
  5. ^ Bansal, Sunita Pant (2012-04-01). Hindu Pilgrimage: A journey through the holy places of hindus all over India (इंग्रजी भाषेत). V&S Publishers. ISBN 9789350572511.
  6. ^ Srinivasan, K. R. (1975). The Dharmarāja ratha & its sculptures, Mahābalipuram (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications.
  7. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा