महादेव विनायक रानडे हे एक स्वातंत्र्यपूर्व काळातील आद्यक्रांतिकारक होते. फेब्रुवारी १८९७ मध्ये तत्कालीन पुण्यात प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. पुण्यातील प्लेगची साथ रोखण्यासाठी ब्रिटिश ऑफिसर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष प्लेग समिती स्थापन करण्यात आली. आणीबाणीचा सामना करण्यासाठी त्यांनी युरोपियन सैन्य आणले. रँड आणि इतर ब्रिटिश अधिकारी प्लेगच्या नावाखाली सामान्य जनतेच्या छळ व लूट करू लागले. त्यामुळे चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ रोजी रँड आणि लेफ्टनंट आयरेश यांची हत्या केली.

पुण्यातील द्रविड बंधूनी पोलिसांना दामोदर हरी चाफेकरची माहिती दिल्याने, त्यांना अटक झाली. द्रविड बंधूंचा बदला घेण्यासाठी वासुदेव हरी चाफेकर, महादेव रानडे आणि खंडो विष्णू साठे यांनी त्यांना गोळ्या घातल्या. फेब्रुवारी १८९९ पर्यंत या सर्वांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. चापेकर बंधू बाळकृष्ण हरी, वासुदेव हरी आणि महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि फाशी देण्यात आली, वासुदेव हरी: ८ मे १८९९, महादेव विनायक रानडे: १० मे १८९९, बाळकृष्ण हरी: १२ मे १८९९. साठे अल्पवयीन होते म्हणून त्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

संदर्भ

संपादन