महादेव मंदिर, धुटेरा (देवसराड)

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तर सीमेवर धुटेरा गावात एका टेकडीवर पुरातन महादेव मंदिर स्थित आहे. या देवस्थानला देवसरड असेही म्हणतात.  हे मंदिर बावनथडी नदीच्या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आणि नैसर्गिक जंगलांनी सजलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे.[]

महादेव मंदीर यात्रा, धुटेरा (देवसराड)

यात्रा

संपादन

या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. भंडारा, गोंदिया जिल्ह्यासोबतच मध्य प्रदेश राज्यातील शेकडो भाविक यावेळी महादेवाचे दर्शन घेतात. महाशिवरात्रीला भाविक महादेवाचा पोहा घेऊन येतात.

अन्य कार्यक्रम

संपादन
 
महादेव मंदीर, धुटेरा

शेवटच्या श्रावण सोमवारी या मंदिरात महाभिषेक, कथा, पूजन व हवन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  यावेळी शेकडो भाविका महाप्रसादाचा लाभ घेतात.चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे

स्थान

संपादन

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. आष्टी-चिखला जिल्हा परिषद क्षेत्रात धुटेरा गाव आहे. बावनथडी नदीपात्रापासून हे तीर्थक्षेत्र अवघ्या २ किमी अंतरावर आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Navabharat Epaper (नवभारत ईपेपर) | Hindi News Epaper | Hindi News Paper". epaper.enavabharat.com. 2023-02-05 रोजी पाहिले.