महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेले महामंडळ आहे. याची स्थापना महाराष्ट्र शासनाने १० जुलै १९७८ रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केली. याचे अधिकृत भागभांडवल ५९९ कोटी रुपयांचे असून यातील ५१ टक्के भांडवल राज्य शासन व ४९ टक्के भागभांडवल केंद्र शासनाचे आहे. हे महामंडळ केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत योजना राबवत असून, या महामंडळाला राज्य सरकार व केंद्र सरकार, कडून निधी प्राप्त होतो. या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालये व विभागीय स्तरावर प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत.

बाह्य दुवे

संपादन