मल्टिपल स्क्लेरॉसिस
मेंदू व चेतासंस्थेतील होणारे मज्जारज्जुतील ऱ्हासाच्या बदलांमुळे संबंधित अवयव कार्य करणे बंद करतात व त्यामुळे रूग्णात अपरिवर्तनीय बदल होतात व विकलांगता येत चालतात.
मल्टिपल स्क्लेरॉसिस | |
---|---|
---- | |
![]() Demyelination by MS. The CD68 colored tissue shows several macrophages in the area of the lesion. Original scale 1:100 | |
ICD-10 | G35 |
ICD-9 | 340 |
OMIM | 126200 |
DiseasesDB | 8412 |
MedlinePlus | 000737 |
eMedicine | neuro/228 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 |
MeSH | D009103 |
GeneReviews | साचा:Citation/make link |


आजाराचे स्वरूप संपादन
मल्टिपल स्क्लेरॉसिस हा विकार मेंदूतील चेता संस्थेतील (सेंट्रल र्नव्हस सिस्टम) संदेशवाहक चेतातंतूंवरील संरक्षक आवरण मायलिनला धक्का पोहोचल्यामुळे होतो. मायलिनला धक्का पोहोचल्याचा परिणाम मेंदूकडून शरीराच्या अन्य भागांकडे पोहोचणाऱ्या संदेशांवर होतो. त्याचा परिणाम म्हणून खालील लक्षणे तयार होतात.
- संवेदनांमध्ये परिवर्तन,
- संवेदना कमी होण्याचे प्रमाण पाया कडून वरील दिशेने बदल करत चालते.
- स्नायुंमधील शिथीलता येते व स्थानू काम करणे कमी करतात.
- मलद्वार व मुत्राशयावरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.
- नेत्रकंप (Nystagmus)- डोळ्याभोवतालच्या स्नायुंच्या कार्यातील बदलाने नेत्रकंप सुरू होतो.
नवीन संशोधन व उपचार पद्धती संपादन
- स्क्लेरॉसिस या गंभीर रोगावर ऑस्टेलियामधील विद्यापीठाच्या संशोधकांनी लस शोधून काढली असून यामुळे रोगाच्या उपचारांना ठोस दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मल्टिपल स्क्लेरॉसिसमुळे रुग्णाच्या मज्जासंस्थेचा झालेला ऱ्हास भरून काढण्याचे काम ही लस करते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.मटा ऑनलाइन वृत्त [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- मज्जारज्जूमधील गुंतागुंत सोडविण्यासाठी "लिबरेशन' ही उपचारपद्धती सध्या वापरात आहे. यात रक्तवाहिन्यांचे अडथळे असताना मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हा शस्त्रक्रिया करून मोकळा केला जातो. या शस्त्रक्रियेत "बलून अॅन्जिओप्लास्टी वापर करून "लिबरेशन' ही पद्धती वापरात आणली जाते.दै.सकाळ Archived 2016-03-06 at the Wayback Machine.