मराठी मुसलमान

(मराठी मुस्लिम समाज या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्वसाधारण मराठी मुस्लिमांच्या उदरनिर्वाहाची साधने

संपादन

अंडी विकणारे, भाज्यांच्या किंवा रद्दीच्या, भंगाराच्या हातगाड्या घेऊन अनवाणी पायांनी दिवसभर उपाशी-तापाशी, उन्हातान्हात वणवण हिंडणारे, सायकली-मोटारसायकलीच्या टायरमध्ये हवा भरून हवा खातच जगू इच्छिणारे किंवा मरणही लवकर यावे, अशी अल्लाची दुवा मागणारे, अंगावरच्या मळकट लक्तरांनिशीच मोलमजुरी मिळते का हे मजूर कट्ट्यावर तिष्ठत तासन्तास बसून वाट पाहत बसणारे अभागी कामकरी मजूर, टपऱ्यांवर व हॉटेलात एक वेळच्या जेवणावर दिवसभर राबणारे बालकामगार, गुरे राखण्यात बालपण हरवलेली मुले,

मराठी मुस्लिम समाज समस्या

संपादन

आपल्याला तीन-चार मुलं झाली, त्यांना या दारिद्र्यात पोसायचे कसे, यासाठीही एक-दोन मुले मदरशांत भरती करणारे असहाय आई-बाप, शासकीय योजना तर सोडाच; पण साधा शैक्षणिक सवलतीचा (इ.बी.सी.चा) फॉर्म भरला म्हणजे शाळेची फी माफ होते, याचीदेखील माहिती नसलेले निरक्षर नेतृत्वहीन सैरभैर नजरांची माणसं, , अनेक हजार रुपयांच्या पगारपत्रकांवर सह्या घेऊन दरमहा हातावर चार-पाचशे रुपयेही न टिकविणारे शोषक, संस्थाचालक, एम.ए. एम.फिल. प्रथम वर्गात प्रथम व नेटसेट होऊनही झिजलेल्या, फाटक्या हवाई, रबरी चपला पुन्हा पुन्हा शिवून वर्षानुवर्षे मुलाखती देऊन-देऊन थकलेले, ‘रया’नी आत्मविश्वास गमावलेले बेकार तरुणनी त्यांनाही पाच-पाच लाख रुपयांच्या देणग्या मागणारे संस्थाचालक, व्होट-बँकेत मतांच्या पंचवार्षिक ठेवी मिळविण्यापुरते भेटणारे नेते, वर्षानुवर्षे अपुऱ्या वेतनावर पिढ्यान्-पिढ्या शेतकाम करणारे सालगडी, इनामे-वतनेनी नवाबी नाहीशी झाल्याने इभ्रतीचा कोसळता डोलारा सावरू न शकणारे व एकेकाळचे नवाबनी इनामदार, अंधश्रद्धानी दैववादात गुरफटलेली मानसिकता, जातीय दंग्यांमुळे होणारी दमछाक, कुणीतरी केलेल्या दहशतवादी कारवायांचे आपल्याला अकारण भोगावे लागणारे आरोप व परिणाम, मुख्य प्रवाहाच्या मध्यभागी उभे असूनही ‘तुम्ही या प्रवाहाबाहेरच आहात’ असा हेतूपुरस्सर केला जाणारा कांगावा प्रचार या चक्रव्यूहात जो मुस्लिम समाज अडकला आहे.[]

संदर्भ

संपादन