मराठी तत्त्वज्ञान महाकोश

मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा तत्त्वज्ञान या विषयाचा कोश आहे. तो तीन खंडात विभागला आहे. मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३० तर्फे १९७४ साली प्रथम प्रकाशित झाला. हा मोठा प्रकल्प होता. प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले आहे. प्रा. वाडेकर २० जून १९६२ रोजी फर्गसन महाविद्यालय-तत्त्वज्ञान विभागातून निवृत्त झाले. निवृत्तीआधीपासून त्यांच्या मनात असा काही कोश मराठीत असावा, असे त्यांनी कोशाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.[] १९६० साली ब्रिटिश तत्त्ववेत्ते जे. ओ. उर्म्सन (James Opie Urmson) यांनी संपादित केलेला 'कन्साईज एन्सायक्लोपीडिया ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी अँड फिलॉसॉफर्स' हा पाश्चात्य क्षेत्रापुरता मर्यादित असा तत्त्वज्ञान विषयक महाकोश प्रसिद्ध झाला. (जे. ओ. उर्म्सन यांचा महाकोश येथे मोफत उपलब्ध आहे. ) त्या धर्तीवर पण केवळ पाश्चात्य अथवा भारतीय तत्त्वज्ञानास वाहिलेला नव्हे तर सर्वसमावेशक व्यापक स्वरूपाचा असे स्वरूप मराठी तत्त्वज्ञान महाकोशास दिले गेले आहे. या महाकोशाची नवी सुधारित आवृत्ती अद्यापि प्रकाशित झालेली नाही.

मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ स्थापना

संपादन

मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ संस्था ही संस्था खास या प्रकल्पपूर्तीसाठी ५ ऑक्टोबर, इ.स. १९६२ रोजी स्थापन करण्यात आली.

व्यवस्थापकीय, विद्याविषयक व आर्थिक सहाय्य

संपादन

संपादक मंडळ

संपादन
  1. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर (प्रमुख संपादक)
  2. प्रा. रं. द. वाडेकर
  3. प्रा. वि. म. बेडेकर
  4. मे. पुं. रेगे
  5. अ. ग. जावडेकर
  6. ना. वि. जोशी
  7. भी. रा. कुलकर्णी
  8. सुरेंद्र शिवदास बारलिंगे
  9. ग.ना. जोशी

विलीनीकरण

संपादन

डॉ. हेमंत वि. इनामदार हे गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष (सन १९९३ ते १९९९) असताना त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात ‘मराठी तत्त्वज्ञान महामंडळ’ (पुणे) या नामवंत संस्थेचे, गीताधर्म मंडळात विलीनीकरण झाले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "प्रस्तावना", मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड १, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, प्रकाशन काळ १९७४ प्रमुख संपादक प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर
  2. ^ "संग्रहित प्रत". 2015-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-15 रोजी पाहिले.