मराठी फिल्म डाटा. कॉम हे मराठी चित्रपट विषयक माहिती देणारे संकेतस्थळ आहे.[१]ते व्ही. शांताराम प्रतिष्ठानद्वारे निर्मित व संचलित आहे. हे संकेतस्थळ १९३२ पासूनच्या मराठी चित्रपटांची सूची उपलब्ध करून देते. मराठी चित्रपटांचा इतिहास , वर्तमान आणि भविष्य याविषयीचे चिंतन येथे व्यक्त केले जाते.

मराठी चित्रपट सृष्टीतील ताज्या घडामोडी, घटना यांची माहिती येथे उपलब्ध आहे. चित्रपट कलाकार, निर्मिती घटक व्यक्ती व संस्था आणि पडद्यामागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती येथे दिली जाते. चित्रपटासह अतिथी कट्टा, चित्र-चारित्र, पुरस्कार असे मुख्य विभाग असून तेथे विविध प्रकारची माहिती दिली जाते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "मराठी चित्रपट सूची". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-17 रोजी पाहिले.