मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ही संघटना छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, जिची स्थापना श्री. अमित रमेश चव्हाण ह्यांनी २०१६ साली मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मराठा समाज एकत्रीकरणासाठी केली होती, परंतु आजच्या स्थितीला मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज एकत्रित करून, भरकटलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून, नवीन मराठा उद्योजक निर्माण करत आहे.


संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे -

१) मराठा समाजतील तरुणांना सक्षम व एकत्र करणे.

२) गडकोट तसेच राष्ट्र पुरुषांच्या समाध्यांचे जतन व संवर्धन करणे.

३) देव, देश, आणि धर्म ह्यासाठी जागरूकता निर्माण करणे व इतिहासाचे विकृतीकरण थांबवणे.

४) शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारणे, व शेतकऱ्यांसाठी शेतकरी ते ग्राहक अस गाव पातळी ते शहर पातळी अस व्यासपीठ निर्माण करणे, पर्यायाने बळीराजाला व महाराष्ट्राला मजबुत करणे.

५) सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करणे.

६) व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला व्यसनमुक्त बनवणे.

७) आज मराठा समाजातील तरुण सर्वात जास्त बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत, त्यामुळे त्या तरुणांना मराठा शिवमुद्रा संघटनेतर्फे जास्तीत जास्त तरुणांना व्यवसाय व नौकरी उपलब्ध करून देणे.

८) ज्यांच्यामुळे स्वराज्य उभे राहिले, अश्या मराठा साम्राज्यातील अनेक मावळ्यांच्या समाध्या ह्या भग्न अवस्थेत आहेत. तर आपलं ध्येय हे ते समाधीस्थळ हे लवकरात लवकर व्यवस्थित सुस्थितीत करणे.

९) छत्रपती शिवशंभूराजेंची शिकवण आम्ही विसरलो नाही. राष्ट्र प्रथम, जे समाजातील तरुण नास्तिक बनले आहेत, त्यांना आपला धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे पटवून आस्तिक बनवणे.

१०) समाजातील चांगल्या कार्यांचे कौतुक करणे, व अनैतिक कार्य करणाऱ्याचा कडाडून विरोध केला होता, करत आहेत व करतच राहणार, तसेच त्याला पर्यायी मार्ग काढणार.

११) समाजातील दीनदुबळ्यांना , अनाथआश्रम, वृद्धाश्रम, ह्यांना वेळोवेळी मदत करणे.

१२) आमच्या मराठा शिवमुद्रा संघटनेतील सदस्य हे आमच्या कुटूंबातील सदस्य आहे. ज्यांच्या सुखात आम्ही शेवटी तर दुःखात आम्ही सर्वात आधी जाणारी एकमेव संघटना म्हणजेच मराठा शिवमुद्रा संघटना.

१३)शिवशंभूराजेंचा व मराठ्यांचा इतिहास जगभर प्रसारित करणे.

चला तर मग महाराष्ट्राला मजबुत, सक्षम, धर्मनिष्ठ करण्यासाठी मराठा शिवमुद्रा संघटनेत सामील व्हा.