छिन्‍नमनस्कता

मानसिक आजार
(मनोभाजन या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून स्किझोफ्रेनिया (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ किंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात.

लोकसंख्येच्या साधारणतः ०.३ ते ०.७% लोग याचे बळी पडतात (२४ लाख लोग २०११ च्या आकडेवारी नुसार). हा रोग मुख्याता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो.

कारणे

संपादन

सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत. स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते. जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही. मुख्यतः वयाच्या १३ ते १९ या काळात झालेले मानसिक आघात हेसुद्धा कारण असू शकते. म्हणजे आनुवंशिकतेमुळे विकार होण्याची शक्यता असते, परंतु जर बाह्य कारण घडले तर रोग जाणवू लागतो.

संकेत आणि लक्षणे

संपादन

प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येणे किंवा भास होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगात बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्यादी गोष्टीही दिसून येतात. या विकारात कल्पना आणि वास्तव यांतील फरक व्यक्तीस करता येत नाही.भास ,भीती, भ्रम , संशय, वाग्ण्याबोलाण्यातली विसंगती,स्वतःची व आपल्या जबाबदारीची जाणीव हळू हळू नष्ट होत जाणे ही लक्षणे ही दिसून येतात

निदान

संपादन

या रोगाचे निदान करणे अतिशय अवघड असून तज्‍ज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत. या रोगाची व्याख्या करणेही अतिशय कठीण आहे. अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात.

सकारात्मक आणि नकारात्मक लक्षणे

संपादन

या रोगाचे वर्गीकरण दोन वर्गात केले जाऊ शकते - सकारात्मक व नकारात्मक.

सकारात्मक लक्षण

संपादन

ही लक्षणे सामान्य माणसात नसतात, पण या रोगाच्या रुग्णात आढळून येतात ( उदा० आवाज, भास, वैचारिक आजार इत्यादी).

नकारात्मक लक्षण

संपादन

शब्द, अभिव्यक्ती (expression), भावना व्यक्त करता न येणं, वा त्यात अडचण येणं, आनंदाची अनुभूती घेता न येन, ही लक्षणे या प्रकारचा त्रास असलेल्या रुग्णांत आढळून येतात.

उपचार

संपादन

लक्षणे लक्षात आल्या बरोबर औषधोपचार चालू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .ते दीर्घकाळ किंवा कित्येकदा आयुष्यभर चालू ठेवावे लागतात विदुतोपचार पद्धतीची खूप मदत होते.इतरही पूरक उपचार आहेत .

स्किझोफ्रेनियावरील मराठी पुस्तके

संपादन