मनीष नरवाल (१७ ऑक्टोबर, २००१ - ) हे एक भारतीय पॅरा नेमबाज आहेत. त्यांनी २०२१ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी टोक्यो येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर पिस्तूल मिक्स इव्हेंट मध्ये सुवर्ण पदाक जिंकले आहे.[] नरवाल ह्यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळविली आहेत.

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

नरवाल हे हरयाणा राज्यातील फरीदाबाद ह्या गावचे आहेत. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉल खेळाडू व्हायचे होते. पण त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांनी वडिलांच्या मित्राच्या सांगण्यावरून नेमबाजीला सुरुवात केली. बल्लभगड येथील राकेश ठाकूर ह्यांच्या नेमबाजीच्या अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली.[]

पुरस्कार

संपादन

नरवाल ह्यांना २०२० साली भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Mar 23, PTI / Updated:; 2021; Ist, 20:17. "Manish Narwal shoots gold in Para-Shooting WC with new world record | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Manish Narwal - Shooting | Paralympic Athlete Profile". International Paralympic Committee (इंग्रजी भाषेत). 2021-09-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Manish Narwal - Shooting | Paralympic Athlete Profile". International Paralympic Committee (इंग्रजी भाषेत). 2021-09-04 रोजी पाहिले.