Manali Refinery (en); मनळी तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr)
मनळी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मनळी रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन द्वारे संचालित एक तेल रिफायनरी आहे. ती १९६९ पासून तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात कार्यरत आहे. ही दक्षिण भारतातील सर्वात जुन्या रिफायनरींपैकी एक आहे.[१] त्याची प्रतिवर्षी १०.५ दशलक्ष टन क्षमता आहे आणि ते इंधन, ल्युब, मेण, पेट्रोकेमिकल फीडस्टॉक्स, [२] लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, मोटर स्पिरिट, हाय स्पीड डिझेल, सुपीरियर केरोसीन तेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन तयार करण्यास सक्षम आहे.