मध्य प्रांत आणि वऱ्हाड

(मध्य प्रांत आणि वऱ्हाड (ब्रिटिश भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
Central provinces and Berar
मध्य प्रांत आणि वऱ्हाड
ब्रिटिश भारतातील प्रांत
ध्वज
चिन्ह

Central provinces and Berarचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Central provinces and Berarचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापना इ.स.१८१८
राजधानी नागपूर
राजकीय भाषा मराठी,इंग्रजी,हिंदी
क्षेत्रफळ ४,८८,८५० चौ. किमी (१,८८,७५० चौ. मैल)
लोकसंख्या १,६८,१३,५८४(१९४१)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

वर्णन

संपादन

मध्य प्रांत आणि वऱ्हाड (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स ॲंन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. या प्रांतातला वऱ्हाड हा उपविभाग हा ब्रिटिश सरकारने हैदराबादच्या निजामाकडून ५ नोव्हेंबर 1902 साली करारावर सही करून २५ वार्षिक रोखसह कायमचा भाडेतत्त्वावर घेतला होता. लॉर्ड कर्झनने बेरारचे मध्य प्रांतात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि 17 सप्टेंबर 1903 रोजी याची घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे 30 सप्टेंबर 1903 रोजीच्या रेसिडेन्सी ऑर्डरद्वारे मध्य प्रांत आणि बेरारचा जन्म झाला आणि बेरारचे प्रशासन मुख्य आयुक्तांच्या अधिपत्याखाली आले..... 1 ऑक्टोबर 1903 नंतर 'बेरार विभाग' प्रांतांसाठी प्रशासक म्हणून पूर्ण प्रांत आयुक्त-जनरल यांच्या अंतर्गत ठेवण्यात आले. 24 ऑक्टोबर 1936 रोजी, 'मध्य प्रांत आणि बेरार'च्या विधानसभेच्या स्थापनेसह, बेरारमध्ये पूर्णपणे विलीन झाल्यानंतर मध्य प्रांत 'मध्य प्रांत आणि बेरार' बनले सध्या स्थितीत मध्य प्रांत आणि बेरार विभागाला विदर्भ म्हणतात. ....विदर्भ आणि महाराष्ट्र राज्य इतिहास काही संबंध नाही

प्रशासकीय विभाग

संपादन

मध्य प्रांताचे प्रशासकीय विभाग:-

१. जबलपूर विभाग

२. नर्मदा विभाग

३. नागपूर विभाग

४. छत्तीसगड विभाग

५. बेरार (वऱ्हाड) विभाग


मध्य प्रांतातील जिल्हे

संपादन

अ] जबलपूर विभाग

संपादन

१. जबलपूर २. सागर ३. दमोह ४. सिवनी ५. मंडला

आ] नर्मदा विभाग

संपादन

६. नरसिंगपूर ७. हुशंगाबाद ८. निमाड ९. बैतुल १०. छिंदवाडा

इ] नागपूर विभाग

संपादन

११. नागपूर १२. भंडारा १३. चांदा (हल्लीचे चंद्रपूर) १४. वर्धा १५. बालाघाट

ई] छत्तीसगड विभाग

संपादन

१६. बिलासपूर १७. रायपूर १८. दुर्ग

उ] वऱ्हाड विभाग

संपादन

१९. अमरावती २०. अचलपूर २१. अकोला २२. बुलढाणा २३. वाशीम २४. वणी २५. पुसदा (संस्थान)

संस्थाने

संपादन

मध्य प्रांतातील संस्थाने:-

१. कालाहंडी २. रायगढ ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर