मधुकर टिल्लू हे मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे एक ज्येष्ठ कलावंत होते. त्यांनी एकपात्रीची कला रुजविताना नवी शैली निर्माण केली. अनेक नव्या कलावंतांवर त्यांचा प्रभाव पडला.

एकपात्री नाट्यप्रयोग

संपादन
  • प्रसंग लहान, विनोद महान (इ.स. १९६१ पासून).(१५००हून अधिक प्रयोग)
  • हसायदान (१०००हून अधिक प्रयोग)
  • ' जिंदादिल ' मराठी शेरोशायरी (५००हून अधिक प्रयोग)
  • ' ह्युमर फ्रॉम प्रोफेशन '(३००हून अधिक प्रयोग)
  • हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम त्यांचा मुलगा मकरंद टिल्लू हे सादर करतात. या एकपात्रीचे ३०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.
  • मधुकर टिल्लू, मुलगा मकरंद टिल्लू, नात हर्षदा टिल्लू अशा टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या एकपात्री कार्यक्रम सादर करत आले आहेत. २०१३ हे या एकपात्री सादरीकरणाचे ५२वे वर्ष होते.)

पाणी वाचवा मोहीम

संपादन

एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी फिरत असताना अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहिल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये रिकामा ग्लास, भरलेला जार नावाचे अभियान सुरू केले. या अभियानाबरोबरच पाण्यासंदर्भात मकरंद टिल्लू यांच्या तीन वर्षांच्या कामामुळे लोकांच्यात पाणी वाचविण्याबद्दल जागरुकता निर्माण झाली.

मधुकर टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • ’संस्कार आईचे’ ट्रस्टचा प्रेरणा पुरस्कार

एकपात्री कलावंतासाठीचे मधुकर टिल्लू पुरस्कार

संपादन

हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देते. पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी :-

  • विजय कोटस्थाने
  • डॉ. विश्वास मेहेंदळे