मद्रासचा तह (इंग्रजीत: Treaty of Madras, ट्रीटी ऑफ मद्रास) हा पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची परिणती म्हणून म्हैसूरचा राज्यकर्ता हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी मद्रास (वर्तमान चेन्नई) येथे झालेला एक तह होता.

तहातील अटी

संपादन

या तहानुसार परस्परांनी परस्परांचे युद्धकैदी आणि जिंकलेला प्रदेश परस्परांना परत केला. ब्रिटिशांनी हैदरअलीचा जितका प्रदेश जिंकला होता तेवढा त्यांना गमवावा लागला. एवढेच नव्हे तर हैदरअलीवर दुसऱ्या एखाद्या सत्तेने आक्रमण केलेच तर ब्रिटिशांनी हैदरअलीच्या मदतीला जाण्याचे मान्य केले.

तहाचे परिणाम

संपादन

पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाने ब्रिटिशांच्या पदरात काहीच पडले नाही. इ.स. १७७१ साली मराठ्यांनी म्हैसूरवर आक्रमण केले त्यावेळी या मद्रासच्या तहाप्रमाणे हैदरअलीने ब्रिटिशांकडे मदतयाचना केली परंतु ब्रिटिश त्याच्या मदतीला धावून आले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून हैदरअलीने परत ब्रिटिशांशी युद्ध करण्याचे निश्चित केले आणि या मद्रासच्या तहामुळेच दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची ठिणगी पडली.

संदर्भ व नोंदी

संपादन