मदारी म्हणजे माकड व माकडीण(स्त्री माकड) यांना पकडून, त्यांना प्रशिक्षण देउन त्यांचेतर्फे करमणुकीचे खेळ करणारी व्यक्ति आहे.यास कोणी दरवेशी असेही संबोधतात.ही भारतातील एक भटकी जमात आहे.[]

यातील व्यक्ति गावोगाव फिरतात व पाळलेल्या माकडाचे खेळ करतात. यात माकडीणीस परकर पोलके व माकडास चड्डी व शर्ट घालण्यात येतो. ते दोघेही नवरा-बायको आहेत असे भासविण्यात येते. मग त्यांचे लुटुपुटुचे भांडण, अबोला व मग दिलजमाई अश्या प्रकारे त्यांचा खेळ रंगतो.[] ते मदाऱ्याच्या नियंत्रणाबाहेर जाउ नयेत व पळुन जाऊ नयेत म्हणुन त्यांचे गळ्यात एक लोखंडी कडे घालून त्यास दोरी बांधण्यात येते.

खेळ सुरू होण्यापूर्वी माणसे जमावीत म्हणून, काहीतरी वाद्य(डफ वगैरे) वाजविण्यात येते. नंतर खेळ झाल्यावर, एक कटोरा/भांडे फिरवुन,मदारी व माकडांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे मागण्यात येतात.[]

मेनका गांधी यांनी भारतात चालविलेल्या पशु अधिकार चळवळीमुळे,व वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे व त्यात झालेल्या संशोधनामुळे (भारतीय प्राणी कल्याण कायदा-२०११) , हे खेळ बहुतांशी बंद झाले आहेत.

हेही पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Cavhāṇa, Rāmanātha Nāmadeva (1989). Bhaṭakyā-vimuktāñce antaraṅga. Sugāvā Prakāśana.
  2. ^ Prabhudesai, Pralhad Krishna. Ādiśaktīce viśvasvarūpa.
  3. ^ Singh, K. S. (1994). Haryana (इंग्रजी भाषेत). Anthropological Survey of India by Manohar Publishers. ISBN 978-81-7304-091-7.