मथुरा बलात्कार प्रकरण
मथुरा बलात्कार प्रकरण हे २६ मार्च १९७२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देसाई गंज पोलीस ठाण्यात घडले, ज्यामध्ये मथुरा ही तरुण आदिवासी मुलगी कैदेत असताना तिच्यावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बलात्कार केला. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त केल्यावर जनतेने निदर्शने केली. परिणामी अंततः गुन्हेगार कायदा (दुसरी दुरुस्ती) १९८३ (क्र. ४६)च्या अंतर्गत भारतीय बलात्कार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली.