मणियार ही महाराष्ट्रातील मुसलमानांची एक विशिष्ट जात आहे. या जातीच्या लोकांना मणेर, मणेरी किंवा मण्यार असेही म्हणतात. मूळ संस्कृत शब्द मणिकारवरून हे शब्द निघाले. ही माणसे बांगड्या, बिलवर, काचेचे मणी, दृष्टमणी, फण्या, चाकू, कातरी, करंडे, आरसे आदी वस्तू तयार करतात आणि विकतात.