मकडी (चित्रपट)
मकडी (इंग्रजीमध्ये वेब ऑफ द विच ) हा विशाल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित २००२ चा भारतीय हिंदी भाषेतला हास्य-भयपट आहे. यात शबाना आझमी, मकरंद देशपांडे, श्वेता बासु प्रसाद आणि आलाप माजगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
2002 Hindi language film directed by Vishal Bhardwaj | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
हा चित्रपट उत्तर भारतातील एका तरुण मुलीची कथा सांगतो जेव्हा ती तिच्या वस्तीतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या एका कथित चेटकीणीशी भेटते. स्थानिक लोक ह्या वाड्याला पछाडलेले मानतात. हे आधुनिक भारतातील जादूटोणा आणि त्यावरील विश्वास स्पष्ट करते.[१] २००३ च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये क्रिटिक्स वीक (स्पॉटलाइट ऑन इंडिया) विभागात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.[२][३][४]
पात्र
संपादन- श्वेता बासु प्रसाद - चुन्नी/मुन्नी
- शबाना आझमी - मकडी, चेटकीण
- मकरंद देशपांडे - कल्लू
- दया शंकर पांडे - शाळेतील शिक्षक
पुरस्कार
संपादनया चित्रपटातील भूमिकेसाठी श्वेता बसू प्रसाद यांना २००३ चा सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात दुसरे पारितोषिक मिळाले.
संदर्भ
संपादन- ^ Subhash K Jha (November 6, 2002). "I want to scare kids". Rediff.com. 3 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 September 2012 रोजी पाहिले.
- ^ "Vishal Bharadwaj's Makdee to be aired at Cannes". द टाइम्स ऑफ इंडिया. 2 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2014 रोजी पाहिले.
- ^ Shah, Shravan (October 2015). ""Shailendra Sigh - Entertainment Maverick, Tells All!"" (PDF). Stardust Magazine/ Starmaker: 19. 7 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 7 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "I wish I could make more female-oriented films: Vishal Bhardwaj - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 7 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-12-07 रोजी पाहिले.