महात्मा फुले मंडई

(मंडई, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

महात्मा फुले मंडई ही पुण्यातली प्रसिद्ध भाजी मंडई आणि ऐतिहासिक ईमारत आहे.

महात्मा फुले मंडई

इतिहास संपादन

पुणे शहराचा भाजी विक्रय शनिवारवाड्याच्या प्रांगणातच चालत असे. सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी त्याला विरोथ केल्यावर ही मंडई शुक्रवारपेठेत हलवण्यात् आली. पुणे शहराच्या नगरपालिकेचे कार्यालय मध्यवस्तीत असावे तसेच बंदिस्त मंडई असावी या दुहेरी हेतूने १८८२ रोजी पुणे नगरपालिकेत ही वास्तू बांधण्याचा प्रस्ताव् मांडला गेला . शहराच्या मध्यवर्ती असणारी ४ एकर जागा निश्चित करून बांधकामास सुरुवात झाली. पुढील तीन वर्षांमध्ये अंदाजे तीन लाख रुपये खर्चून ह्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.

दिनांक ५ ऑक्टोबर १८८६ रोजी ह्या ईमारतीचे उद्घाटन तत्कालिन मुंबई प्रांताचे गव्हर्नर 'ड्यूक ऑफ कनॉट, के. जी’ म्हणजेच लॉर्ड रे यांच्या हस्ते मंडईच्या इमारतीचे उद्घाटन झाले.[१] म्हणूनच ह्या वास्तूस अनेक वर्षे रे मार्केट असे संबोधण्यात येत असे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटनंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मंडई होती.

इथेच् स्थापन झालेल्या अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांनी अनेकदा जनजागृतीसाठी व्याख्याने दिली होती.

१९३८ मध्ये आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेचे सभासद असताना त्यांनी या मंडईचे ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण केले.[२]

१९६६ सालापर्यंत पुणे महानगरपालिकेचे कार्यालय ह्याच ईमारतीत होते.

स्थापत्य संपादन

अष्टकोनी मिनार् मध्यवर्ती असणारी मंडईची वास्तू हा अँग्लो- इंडियन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. मंडईच्या छतावर असलेली कौले ही त्याकाळी फ्रान्समधून आयात करण्यात आली होती. या कौलांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव प्रत्येक कौलावर ठळकपणाने दिसते.

संदर्भ संपादन

  1. ^ "मंडईच्या उद्घाटनाचे 'निमंत्रण'". महाराष्ट्र टाईम्स.
  2. ^ "महात्मा फुले मंडईच्या छतावर ८० टक्के हेरिटेज कौले अजूनही ठणठणीत". लोकसत्ता.