मंजुश्री गोखले
मंजुश्री गोखले (जन्म : २१ नोव्हेंबर १९५७) या एक मराठी लेखिका आहेत. इचलकरंजीच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये त्या आधी शिक्षिका होत्या आणि नंतर त्या कोल्हापूरला गेल्या आणि तेथील महाराष्ट्र काॅलेजमधून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. मंजुश्री गोखले यांनी कविता, लघुकथा, कादंबरी, पाकशास्त्र, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांत लेखन केले आहे. त्यांची सुमारे २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सासूची माया या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत.
मंजुश्री गोखले यांची पुस्तके
संपादन- अग्निलाघव (रहस्यकथा)
- अधाराच्या सावल्या (रहस्यकथा)
- अमृतसंदेश माहात्म्य (आध्यात्मिक)
- आकृतीगंध (चारोळीसंग्रह)
- ओंकाराची रेख जना (कादंबरी)
- ओंजळीतले मोती (कथासंग्रह)
- जोहार मायबाप जोहार (कादंबरी)
- फुलपाखरांचा गाव (चारोळीसंग्रह)
- तुक्याची आवली (कादंबरी)
- फास्ट-ब्रेकफास्ट (पाककृती संग्रह)
- बुफे आणि फेफे (कथासंग्रह)
- रंगपश्चिमा (प्रवासवर्णन)
- रानगंध (कवितासंग्रह)
- शिशिरसांज (कवितासंग्रह)
- Satyam Shivam Sundaram (इंग्रजी; माहितीपर)
- सासूची माया (कथा-पटकथा-संवाद)
- स्वस्तिकाची फुले (कथासंग्रह)
- हास्यमेव जयते (कथासंग्रह). : ना.ज. जाईल यांचा याच नावाचा विनोदी किस्सासंग्रह आहे.
- ज्ञानसूर्याची सावली (कादंबरी)
मंजुश्री गोखले यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- 'जोहार मायबाप जोहार' पुस्तकाला खामगावचा कै. वरणगावकर स्मृती पुरस्कार (सन २०१२)
- 'तुक्याची आवली' या पुस्तकाला 'तुका म्हणे पुरस्कार' (२००८)
- 'तुक्याची आवली' या पुस्तकाला प्रतिभा पाटील वाचनवेध पुरस्कार