मंगरुळपीर

मंगरुळपीर तालुक्याचे मुख्य शहर
(मंगरूळपीर (शहर) या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात असलेल्या मंगरूळपीर तालुक्याचे प्रशासकीय शहर हे मंगरूळपीर शहर आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने हिंदू व मुस्लिम आहे. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात.

नगरपालिका

संपादन

मंगरुळपीर येथील नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात नवी आहे. मंगरुळपीर येथे १९५९ मध्ये नगरपालिका स्थापन झाली आणि महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 अंतर्गत शासित आहे. ११.७६ चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे. नगरपरिषद १० सदस्यांची बनलेली आहे ज्यात एकही जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा महिलांसाठी आरक्षित नाही.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन
  1. दादा हयात कलंदर दर्गा
  2. श्री बिरबलनाथ महाराज मंदिर
  3. श्री चक्रधर स्वामी मंदिर
  4. श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://en.wikipedia.org/wiki/Mangrulpir

साचा:वाशिम जिल्ह्यातील शहरे