भैरवनाथ मंदिर (पाबळ)

(भैरवनाथ मंदिर, पाबळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पाबळ या गावात पाच मंदिरे आहेत त्यापैकी गावाचे ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ मंदिर आहे. गावाची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. परंपरेने चालत आलेले व यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेली बैलांची शर्यत (गाडे) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद करण्यात आले आहेत.[] गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य (तमाशा) असतो,महिला, तरुण वर्ग, बालके यांच्यासाठी कृत्रिम दागिने, खेळणी, झोके, खाद्य पदार्थ (गुडी शेव- रेवडी वैशिष्ट्य) इ. गोष्टींने यात्रेच्या दिवशी एक वेगळीच शान येते.गावात प्रवेश करताना वेशिलगत हनुमानच व शंकराचे मंदिर आहे. वेशीतून आत आल्यावर सय्यद बाबाची मशीद आहे.दोन तीन दुकाने सोडूनच भव्य असे जैन मंदिर आहे.येथे देशभरातुन लोक दर्शनासाठी येतात.
प्रत्येक शुक्रवारी पाबळ येथे मोठा बाजार भरतो.बाजारामध्ये छोटे-छोटे व्यापारी,वांगी,वाटाणा,मेथी,कोबी,बटाटा,गाजर,कांदे,कोथिंबीर,भेंडी,या प्रकारच्या,पालेभाज्या घेऊन येतात. तसेच मटकी,हुलगा,चावली,मसूर,हरभरा,मुग ही कडधान्ये घेऊन येतात.अशा प्रकारे एकूणच बाजारामध्ये भव्य अशी गर्दी असते.गावात सर्व सण उस्ताहाणे साजरे केले जातात.इतकेच नव्हे तर गावात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन तितक्याच जल्लोषाने साजरे केले जातात.गावातून खूप मोठी प्रभात फेरी काढली जाते.
शिरूर तालुक्यातील सर्वात मोठा घाट म्हणून पाबळचा घाट ओळखला जातो.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या गाडे बंद करण्यात आले आहे. पाबळच्या यात्रेची एक वेगळीच शान असते.बाहेरगावी गेलेल्या लोकांना परत आपल्या गावी येण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे.या यात्रेत एक वेगळीच मजा येते. पाबळ गावाला एकूण १२ वाड्या आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4974257782296675957&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20140508&Provider=-&NewsTitle=%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%20(%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96)[permanent dead link]