भेरली माड, अर्धी सुपरी(शास्त्रीय नाव: Caryota urens, कॅरिओटा युरेन्स ; इंग्लिश: Jaggery palm, Toddy palm ;) हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात (कोंकण, महाबळेश्वर) नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो. मोठ्या झाडापासून एका दिवसात १५ लिटर नीरा काढता येऊ शकते.[१] नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळून-आटवून गुळीसाखर करता येते.

भेरली माड
Fish tail palm.JPG
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मॅग्नोलियोफायटा

इतर ताडामाडाप्रमाणे भेरली माड हा देखील सदाहरीतवृक्ष आहे.पुणे मुंबईत वृक्षप्रेमींनी बागेत व रस्त्याच्या कडेला हा वृक्ष लावलेला आहे.याच्या लोबकाळनाऱ्या फुलोऱ्याच्या माळणी याल शिजवटा हे नाव पडले आहे. हा फुलोरा फुले असतानाही व फळे असतानाही खूप सुरेख दिसतो.
ताड-कुळातील हा एकच वृक्ष असा आहे कि जो समुद्रसपाटीपासून सह्याद्रीच्या उंच भागात सर्वत्र सापडतो.या वृक्षाचे जन्मस्थानाच सह्याद्री आहे.
भेरली माडाचे वृक्ष हे ३०-४० फूट उंच असते.त्याचे खोड एकेरी गोलाकार सरळसोट वाढणारे आणि बाहेरील बाजूला थोडे खडबडीत असते.याच्या संपूर्ण वाढलेल्या बुंध्याचा घेर ५-६ फूट एवढा असतो.पर्निकांचा माशांच्या शेपटीच्या तोकासारख्या असल्यामुळे याला इंग्रजी नाव'फिश टेल पाम'असे पडले आहे.याच्या फुलोर्यात नर व मादी अशी दोन्ही फुले असतात.परिपक्व झालेले फळ गोलाकार असून त्याला मांसल आवरण असते.त्याच्या आत दोन अर्धावर्तुळच्या आकाराच्या दोन बिया असतात.या बियांना अर्धी सुपारी म्हणतात.अस म्हणतात कि अर्ध सुपार्या उगलून त्याचा लेप डोक्याला लावल्यास अर्धशीशीचा त्रास कमी होते.भेरली माडाची फळे कालींदर फार आवडीने खातो.परंतु माणसाने ती खाल्ल्यास तोंडाला खाज सुटते कारण त्यामध्ये कॅंल्शियम ओक्झेलेट नावाचे रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असते.या झाडाचे कॅंरिओटायुरेन्स हे नाव याच गुणधर्मावर आधारित आहे.कारण युरेन्स या शब्दाचा अर्थ 'खजरा'असा होते.साधारणतः ऑक्टोबर पासून ते में पर्यंत भेरली माडाला बहार येतो.पावसाळ्यापूर्वी याची फळे परिपक्व होतात.ही पिकलेली फळे केशरी निळसर रंगाची असतात.फुलोऱ्याच्या काळात फुलांचा आणि फळे पिकल्यावर फळांचा सदा-सदा म्हणण्यापेक्षा ढीगच या झाडाखाली पडलेला असतो.
या झाडाला फुलोरा येण्याची तऱ्हा अगली वेगळीच असते.हा वृक्ष प्रथम सरळ वाढत जातो.पण जेव्हा वयात येतो व फुलण्या फळन्या लायक होते तेव्हा त्याला सर्वात पहिला फुलोरा अगदी वरच्या टोकाच्या पानाच्या खाचेतुन निघतो.फुलोरे क्रमशः पानाच्या खाचेतून निघतात.जेव्हा अगदी खालचा फुलोरा येतो तेव्हा तेथले पान आधीच पडून गेलेले असते व त्या पादुन्गेलेल्या पानाच्या फुलोर्याची मुखरी बाहेर पडलेली दिसते.
या वृक्षाचे आयुष्य हे पन्नास वर्षापर्यंत आहे.सर्वात खालचा फुलोरा बाहेर पडतानाच या वृक्षाच्या पानाच्या खाचेतून पक्षांच्या विष्ठेतून रुजणारे वड पिंपळ इत्यादी वृक्षाचे रुजणारे अंकुर दिसू लागतात,तेव्हा या वृक्षाच्या जीवनाची सांगता झाली आहे अस समजण्यास हरकत नाही.

संदर्भसंपादन करा

  1. ^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १७२.