भृगुसंहिता
हिंदू ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सदर ग्रंथ हा ज्योतिषशास्त्र विषयावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. महर्षी भृगू हे याचे कर्ते आहेत.[१]
आख्यायिका
संपादनभृगू हे एक वैदिक ऋषी असून त्यांचे आयुर्मान १०,००० वर्षे होते अशी आख्यायिका प्रचलित आहे.महाभारत ग्रंथात ही त्यांचा उल्लेख सापडतो. परंतु हे एक वांशिक नावही असल्याने नेमक्या भृगू नावाच्या कोणत्या व्यक्तीने या विशिष्ट ग्रंथाची रचना केली हे समजू शकत नाही. याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.[२]
विषय
संपादननवग्रहांचा प्रभाव तसेच फलित ज्योतिष हे या ग्रंथात मांडले गेलेले विषय आहेत.[३]
वैशिष्ट्य
संपादनभारतीय किंवा हिंदू ज्योतिषशास्त्र विषयातील ग्रंथांपेक्षा या ग्रंथाचे वेगळेपण असे मानले जाते की या ग्रंथात महर्षी भृगू यांनी प्रत्येक व्यक्तीचे भूतकालीन,वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असे तिन्ही काळातील जीवन चित्रण केलेले आहे.[४]
- ^ Rao, T. M. (2008). Bhrigu Samhita (इंग्रजी भाषेत). Pustak Mahal. ISBN 9788122310214.
- ^ Lane, David (2014). THE MYSTICAL: Exploring the Transcendent (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781565431737.
- ^ BHRIGU, MAHARSHI (2015-01-09). BHRIGU SANGHITA (हिंदी भाषेत). V&S Publishers. ISBN 9789352150274.
- ^ Sharma, A. K. (1993). Prophecies & Predictions (इंग्रजी भाषेत). Pustak Mahal. ISBN 9788122305517.