भुवन
भुवन (उपग्रहीय चित्रक)
संपादनभुवन (संस्कृत: भुवन, शब्दशः पृथ्वी) हे गुगल अर्थ आणि विकिमॅपिया यांच्याशी साधर्म्य असणारे उपग्रहीय चित्रणाचे साधन आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्याचा विकास केलेला आहे. दहा मीटरपर्यंतचे विभेदन (अर्थात जमिनीवर एकमेकींपासून १० मी इतक्या अंतरावर असणाऱ्या दोन वस्तू स्पष्टपणे वेगळ्या दाखविणे) पुरविणारे हे साधन गुगल अर्थ आणि विकिमॅपियाचे प्रतिस्पर्धी मानले जाते.
या अनुप्रयुक्ताचा आद्यनमुना (बीटा) १२ ऑगस्ट २००९ रोजी या Archived 2011-06-15 at the Wayback Machine. ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.