भीम ॲप
भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप अँड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
सभासद
संपादनभारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.[ संदर्भ हवा ]
बँकांची यादी
संपादन- १. ॲक्सिस बँक
- २. अलाहाबाद बँक
- ३. आंध्र बँक
- ४. आयडीएफसी बँक
- ५. आयडीबीआय बँक
- ६. आयसीआयसीआय बँक
- ७. आरबीएल बँक
- ८. इंडसइंड बँक
- ९. इंडियन ओव्हरसीज बँक
- १०. इंडियन बँक
- ११. एचएसबीसी बँक (हॉंगकॉंग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड)
- १२. एचडीएफसी बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट अँड फायनान्सिंग कॉर्पोरेशन बँक)
- १३. ओरियेन्टल बँक ऑफ कॉमर्स
- १४. कॅथॉलिक सिरियन बँक
- १५. कॅनरा बँक
- १६. करूर वैश्य बँक
- १७. कर्नाटक बँक
- १८. कोटक महिंद्र बँक
- १९. कॉर्पोरेशन बँक
- २०. टीजेएसबी (ठाणे जनता सहकारी बँक)
- २१. डीसीबी बँक
- २२. देना बँक
- २३. पंजाब नॅशनल बँक
- २४. फेडरल बँक
- २५. बँक ऑफ इंडिया
- २६. बँक ऑफ बडोदा
- २७. बँक ऑफ महाराष्ट्र
- २८. युको बँक (युनायटेड कमर्शियल बँक)
- २९. युनायटेड बँक ऑफ इंडिया
- ३०. युनियन बँक ऑफ इंडिया
- ३१. येस बँक
- ३२. लक्ष्मी विलास बँक
- ३३. विजया बँक
- ३४. साउथ इंडियन बँक
- ३५. सिटी युनियन बँक
- ३६. सिंडिकेट बँक
- ३७. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
- ३८. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक
- ३९. स्टेट बँक ऑफ
- ४०. स्टेट बँक ऑफ
- ४१. स्टेट बँक ऑफ इंडिया
- ४२. स्टेट बँक ऑफ
- ४३. स्टेट बँक ऑफ
- ४४. स्टेट बँक ऑफ
पर्याय
संपादनया ॲपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.[ संदर्भ हवा ]
- पैसे पाठवण्यासाठी :
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.[ संदर्भ हवा ]
- पैसे स्वीकारण्यासाठी :
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.[ संदर्भ हवा ]