भास्कर दामोदर पाळंदे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भास्कर दामोदर पाळंदे हे मराठीतील एक श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म इसवी सनाच्या एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला असावा. ते ठाणे शहराचे रहिवासी होते. इंग्रजी राजवटीत ते न्यायाधीश होते.
पाळंदे यांच्या साहित्यकृती
संपादन- विक्रमोर्वशीयम् या कालिदासाच्या संस्कृत नाटकाचे १८५४ साली केलेले गद्यपद्यात्मक मराठी भाषांतर
- रत्नमाला हा भक्तिकविता संग्रह
- 'आई थोर तुझे उपकार' ही मराठीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातील लोकप्रिय कविता
आई थोर तुझे उपकार
संपादन- थोर तुझे उपकार
- आई थोर तुझे उपकार || ध्रु० ||
- वदत विनोदें हासत सोडी
- कोण दुधाची धार || १ ||
- नीज न आली तर गीत म्हणे
- प्रेम जिचें अनिवार || २ ||
- येई दुखणें तेव्हां मजला
- कोण करी उपचार || ३ ||
- कोण कडेवर घेउनी फिरवी
- चित्तीं लोभ अपार || ४ ||
- बाळक दुर्बळ होतों तेव्हां
- रक्षण केलें फार || ५ ||
- त्वांचि शिकविलें वाढविले त्वां
- आहे मजवर भार || ६ ||
- स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
- होतें वारंवार || ७ ||
- नित्य करावें साह्य तुला मी
- हा माझा अधिकार || ८ ||
- आई थोर तुझे उपकार || ९ ||