भाषाशास्त्र

भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र
(भाषा प्राप्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
  • खालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.

भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक[][] पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.

भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.

या ज्ञानशाखांची नावे

संपादन

विसाव्या शतकाआधी, " मानवशास्त्र " (Anthropology) ही संज्ञा,सन १७१६मध्ये प्रथम निश्चित झाली[]

प्रमुख शाखा

संपादन

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा न घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)[] आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन



बाह्य दुवे

संपादन