तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध झालेला 'भाषाप्रकाश' हा मराठी शब्दकोश पुणे विद्यापीठ प्रकाशनाने १९६२ साली प्रकाशित केला. या कोशाचा कर्ता 'रामकवी' हा आहे. हा कोश तयार करण्यासाठी ग्रंथलेखकाने ज्ञानेश्वरीचा आधार घेतला आहे. हा कोश पद्यबद्ध असून तो अनुष्टुप छंदात रचलेला आहे. या ग्रंथाची रचना १८ व्या शतकाच्या अखेरीस किंवा १९ व्या शतकाच्या आरंभी झाली असावी असे अनुमान आहे. डॉ .शं.गो.तुळपुळे यांनी या कोशाच्या संपादनाचे काम केले आहे. या कोशाची विभागणी एकूण २३ वर्गामध्ये करण्यात आली आहे. बहुतेक वर्गांच्या सुरुवातीला त्या त्या वर्गातील विषयाचे सूचन केले आहे. उदा. दान वर्ग, काल वर्ग इ. मराठीतील अमरकोश म्हणता येईल असे या कोशाचे स्वरूप आहे. या कोशात सुमारे साडे चार हजार मराठी शब्दांचा विषयवारीने संग्रह केला आहे.

डॉ. नीलिमा गुंडी यांनी भाषाप्रकाश याच नावाचे मराठी भाषेत होणाऱ्या बदलांसंबंधीचे पुस्तक लिहिले आहे.

संदर्भ

संपादन
  • Empty citation (सहाय्य)

रामकवीकृत भाषाप्रकाश, संपादक - शं.गो. तुळपुळे, प्रकाशन वर्ष १९६२

हे सुद्धा पहा

संपादन