भारत सरकार कायदा १८५८
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १८५८ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेत इ.स. १८५८मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
*Pits India act 1784, ने केलेली विभागणी रद्द करण्यात आली.भारताच्या 'गव्हर्नर जनरल' ऐवजी व्हाईसरॉय
नाव देण्यात आले.