धनचिडी

एक पक्षी
(भारतीय राखी धनेश या पानावरून पुनर्निर्देशित)

जवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा धनचिडी ,धनेश किंवा राखी शिंगचोचा हा २४ इंच आकारमानाचा पक्षी आहे. म्हणजे याचा आकार साधारणपणे घरीएवढा असतो. याचा मुख्य रंग राखाडी असून चोच काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार असते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असते. सर्व वेळ झाडावरच घालवणारा हा पक्षी वड, पिंपळ अशा वृक्षांवर राहणे आणि त्या झाडांची फळे खाणे, मोठे किडे, पाली, सरडे, उंदीर, क्वचित प्रसंगी लहान पक्षी खाणे पसंत करतो. हा पक्षी उडत जातांना पंखांचा मोठा आवाज होत असल्याने चटकन लक्ष वेधून घेतो.

धनचिडी
शास्त्रीय नाव
(Ocyceros birostris)
कुळ धनचंचवाद्य
(Bucerotidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश इंडियन ग्रे हॉर्नबिल
(Indian Grey Hornbill)
संस्कृत वार्ध्रीणास, मातृनिंदक
हिंदी चलोत्रा, सेलगिल्ली

धनचिडीचा अंडी देण्याचा काळ साधारणपणे मार्च ते जून महिने असा असून तिचे घरटे झाडाच्या ढोलीत असते. घरटी मोठ्या झाडांच्या ढोलीत बांधली जातात. मादी ढोलीत बसल्यावर नर आणि मादी फक्त थोडी फट ठेवून ती ढोली आपल्या विष्टेने बंद करून घेतात. या घरट्यात मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते. नर घरट्याबाहेर राहून ढोलीतील मादीला अन्न खाऊ घालतो. मादी ढोलीत राहून अंडी उबविण्याचे काम करते. अंड्यातून पिले बाहेर आल्यावर मादी आपल्या घरट्याचे आवरण फोडून बाहेर येते. नर आणि मादी पुन्हा ती ढोली पूर्वीसारखीच बंद करून घेतात आणि आतील पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोघेही पिलांना अन्न खाऊ घालतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर पिले आपले घरटे फोडून बाहेरच्या जगात येतात.

धनचिडीच्या चोचीवर शिंगासारखे जाड आवरण असल्याने तिला शिंगचोचा असेही म्हणतात, इंग्रजीत या पक्षाला इंडियन ग्रे हॉर्नबिल असे म्हणतात (शा : Tockus birostris).

चित्रदालन

संपादन